PM Modi Lok Sabha Speech: पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु असताना लोकसभेत चांगलाच गदारोळ माजला. गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ऑपरेशन महादेवमध्ये लष्कराने पहलगाममधील गुन्हेगारांना ठार मारले आहे. मारले गेलेले दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे आढळलेल्या पुराव्यांबद्दलही त्यांनी सभागृहाला माहिती दिली. काँग्रेस खासदरा प्रियांका गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. केंद्र सरकारनं ऑपरेशन सिंदूरचं श्रेय घेतलं पण हल्ल्याची जबाबदारी का स्वीकारली नाही असा थेट सवाल प्रियकां गांधी यांनी नरेंद्र मोदी केंद्र सरकारला विचारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला उत्तर दिले.
भारत पाकिस्तान युद्ध कसे थांबले. ऑपरेशन सिंदूरबाबत PM मोदी यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा जाहीर खुलासा पंतप्रधान मोदी यांनी केला. आम्ही ठरल्याप्रमाणे कारवाई केली. हा तंत्रज्ञानाच्या युद्धाचा काळ आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान आमच्या मेड इन इंडिया क्षेपणास्त्रे आणि तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली. आमच्या तिन्ही सैन्याने पाकिस्तानला सळो की पळो केले. भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर सोडणार नाही जशाच तसे उत्तर देऊ. आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या पद्धतीने प्रत्युत्तर देऊ. आता कोणीही न्यक्लीअर हल्ल्याच्या नावाने ब्लॅकमेलिंग केले तर चालणार नाही. आम्ही दहशतवाद्यांना आणि त्यांच्या संरक्षक सरकारला वेगळे पाहणार नाही. परराष्ट्र धोरण आणि समर्थनाबद्दल येथे बरेच काही सांगितले गेले.
जगातील कोणत्याही देशाने भारताला त्याच्या सुरक्षेत कारवाई करण्यापासून रोखले नाही. संयुक्त राष्ट्रांच्या 193 पैकी फक्त तीन देशांनी पाकिस्तानच्या समर्थनात निवेदन दिले होते. क्वाड असो, ब्रिक्स असो, कोणताही देश असो, भारताला जगभरातून पाठिंबा मिळाला. मी परराष्ट्र धोरणाबद्दल स्पष्टपणे बोलत आहे, आम्हाला जगाचा पाठिंबा मिळाला, परंतु दुर्दैवाने देशातील वीरांच्या शौर्याला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर वारंवार टीका करण्यात आली. भारतीय सैन्यावर विश्वास नाही. असे करून ते कदाचित प्रसिद्धी मिळवू शकतील, पण देशवासीयांच्या हृदयात स्थान मिळवू शकत नाहीत. पाकिस्तानवर भराताने हल्ला केल्यानंतर 10 मे रोजी युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन थांबवण्यास सांगितले नाही. त्याच वेळी, 9 तारखेच्या रात्री, अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. ते एक तास प्रयत्न करत होते, पण मी सैन्यासोबतच्या बैठकीत होतो. नंतर मी त्यांना परत फोन केला. मग त्यांनी मला सांगितले की पाकिस्तान खूप मोठा हल्ला करणार आहे. . जर पाकिस्तानने हल्ला केला तर आम्ही मोठ्या हल्ल्याने उत्तर देऊ. असे उत्तर मी त्यांना दिले. भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचा थरकाप उडाला. समाधानकारक कारावाई केल्यान भारचीय सैन्याने युद्ध थांबवले असा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.