Marathi News> भारत
Advertisement

पंतप्रधान मोदींच्या पत्नीच्या गाडीला अपघात, एकाचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. कोट्टा-चितौड महामार्गावर हा अपघात झाल्याचं कळतं आहे. 

पंतप्रधान मोदींच्या पत्नीच्या गाडीला अपघात, एकाचा मृत्यू

जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. कोट्टा-चितौड महामार्गावर हा अपघात झाल्याचं कळतं आहे. 

जसोदाबेन या अपघातात जखमी झाल्या असून त्यांच्या डोक्याला मार लागल्याची माहिती येत आहे. कोटा-चित्तोर महामार्गावर झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला असल्याची देखील माहिती येत आहे. एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.

fallbacks

जसोदाबेन यांना चितौडगड येथील रुग्णालयात दाखल केले आहे. जसोदाबेन या कोटा येथून एका विवाहसोहळयावरुन परत येत असतांना हा अपघात झाला.

Read More