Marathi News> भारत
Advertisement

कर्नाटक निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुतम मिळालेलं नाही.

कर्नाटक निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुतम मिळालेलं नाही. भाजप हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष झाला आहे. पण भाजपला सत्ता स्थापनेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आले आहेत. या दोन्ही पक्षांनी मिळून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. आमच्याकडे ११७ आमदारांचा पाठिंबा असल्याचं काँग्रेसनं सांगितलं आहे. तर भाजपनंही राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसाठी आपल्याला बोलवायची विनंती केली आहे. कर्नाटकमधली चुरस वाढत असतानाच निकालाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपला सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष बनवल्याबद्दल आणि भाजपच्या विकासाच्या अजेंड्याला पाठिंबा दिल्याबद्दल कर्नाटकच्या बंधू आणि भगिनींचे आभार. कर्नाटकमध्ये पक्षासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांना माझा सलाम, असं ट्विट नरेंद्र मोदींनी केलं आहे.  

 

Read More