Marathi News> भारत
Advertisement

coronavirus: मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत पंतप्रधान मोदींकडून परिस्थितीचा आढावा

अमित शाह आणि राजनाथ सिंह यांचीही या व्हि़डिओ कॉन्फरन्स बैठकीला उपस्थिती

coronavirus: मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत पंतप्रधान मोदींकडून परिस्थितीचा आढावा

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आढावा बैठक घेतली. 

सूत्रांच्या माहितीनुसार परिस्थितीवर या बैठकीत अधिक गांभीर्याने चर्चा केली जाईल. सोबतच कोरोना पॉझिटीव्ह असणाऱ्या आणि विलगीकरणामची भीती असणाऱ्यांचा शोध घेण्याच्या मुद्द्यावरही बैठकीत प्रकाश टाकण्यात आला असावा अशी शक्त आहे. 

 

अद्यापही सुरु असणाऱ्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती आहे. कोरोनाची वाढती लागण टाळण्यासाठी येत्या काळात परदेशवारी करुन आलेल्या सर्व व्यक्तींचा अधिक काटेकोरपणे शोध घेतला जावा इथपासून, आरोग्यसेवेसाठीच्या उपकरणांची उपलब्धता, तबलिगी जमातमधील सहभागी झालेल्यांचा शोध घेणं या मुद्द्यांवर या बैठतीत चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. काही क्षणांतच या बैठकीचे सर्व तपशील समोर येतील. 

(सविस्तर वृत्त लवकरच) 

 

Read More