PM Narendra Modi Ganesh Puja Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी रात्री अचानक गणपती दर्शनसाठी दिल्लीतील एका खास घरी पोहोचले. पंतप्रधान मोदींचा गणरायांची आरती करणाचा व्हिडीओ आणि फोटो पाहता पाहता सोशल मीडियावर व्हायरल झाले. पंतप्रधान मोदी यांच्या घरी पोहचले होते त्या व्यक्ती म्हणजे देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड! चंद्रचूड यांच्या दिल्लीतील घरी मागील अनेक वर्षांपासून गणरायांची प्रतिष्ठापना केली जाते. यंदा चंद्रचूड यांच्या घरच्या गौरी-गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान पोहोचले.
पंतप्रधान मोदींनी चंद्रचूड यांच्या घरच्या गणरायाची आणि गौरींची मनोभावे पूजाही केली. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी डोक्यावर पांढरी गांधी टोपी घालून पूजा करताना दिसत आहेत. मोदींच्या एका बाजूला चंद्रचूड आरती म्हणत टाळ्या वाजवत असून दुसऱ्या बाजूला चंद्रचूड यांची पत्नी कल्पना दास उभ्या असून त्यासुद्धा गणरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
VIDEO | PM Modi (@narendramodi) participates in Ganpati Puja at CJI DY Chandrachud's residence in Delhi.
— Press Trust of India (@PTI_News) September 11, 2024
(Source: Third Party) pic.twitter.com/yHhEwmJb6i
पंतप्रधानांनीही या भेटीदरम्यानचा एक फोटो आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन शेअर केला आहे. त्यांनी हा फोटो शेअर करताना, "सरन्यायाधीश, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूडजी यांच्या निवासस्थानी गणेश पूजेत सामील झालो. भगवान श्री गणेश आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य देवो," अशी मराठीमध्ये कॅप्शन दिली आहे.
सरन्यायाधीश, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड जी यांच्या निवासस्थानी गणेश पूजेत सामील झालो.
— Narendra Modi (@narendramodi) September 11, 2024
भगवान श्री गणेश आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य देवो. pic.twitter.com/5jNA0i45Zb
मोदींनी गणेश चतुर्थीच्या दिवशीही 'गणपती बाप्पा मोरया' असं म्हणत एक व्हिडीओ शेअर करुन सर्व गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या होत्या.
समस्त देशवासियों को गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। गणपति बाप्पा मोरया! pic.twitter.com/is3Jvnygju
— Narendra Modi (@narendramodi) September 7, 2024
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईतील लालबागचा राजाचं सपत्निक दर्शन घेतलं. अमित शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शनही घेतलं होतं.