Marathi News> भारत
Advertisement

VIDEO: 'तिहेरी तलाकविरोधात कायदा करणाऱ्या मोदींनी स्वत:च्या पत्नीला वाऱ्यावर सोडले'

मोदी आजपर्यंत कधीच खरं बोलले नाहीत, हीच समस्या आहे.

VIDEO: 'तिहेरी तलाकविरोधात कायदा करणाऱ्या मोदींनी स्वत:च्या पत्नीला वाऱ्यावर सोडले'

लखनऊ: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिम महिलांचा मोठा कैवार घेतात. त्यासाठी मोदींनी तिहेरी तलाकविरोधात कायदाही आणला. मात्र, त्याच मोदींनी स्वत:च्या पत्नीला घटस्फोट न देताच वाऱ्यावर सोडून दिले, अशी बोचरी टीका राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंह यांनी केली. ते बुधवारी बागपत येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. अजित सिंह यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी खोटे बोलत नाहीत. परंतु समस्या हीच आहे की, ते आजपर्यंत कधीच खरे बोलले नाहीत. ते लहान मुलांना सतत खरे बोला, असा उपदेश करत असतात. मात्र, मोदींच्या आई-वडिलांनीच त्यांना खरे बोलायला शिकवले नाही. मोदी मुस्लिम महिलांच्या बाजूने उभे असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी तिहेरी तलाकविरोधी कायदाही मोदींनी आणला. मात्र, त्याच मोदींनी स्वत:च्या पत्नीला घटस्फोट न देताच वाऱ्यावर सोडले, अशी टीका अजित सिंह यांनी केली. 

एवढेच नव्हे तर मोदींना देशात आपण सोडून कोणीही काम करत नसल्याचे वाटते, असा टोलाही अजित सिंह यांनी लगावला. मोदी कधी श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले तर तिथून परत आल्यानंतर रावणाचा वध मीच केला, हे बोलायलाही ते कचरणार नाहीत, असे वक्तव्यही अजित सिंह यांनी केले.

Read More