Marathi News> भारत
Advertisement

पंतप्रधान मोदींची 'ती' कृती, सोशल मीडियावर VIDEO होतोय व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगती मैदान इंटिग्रेटेड ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाचा मुख्य बोगदा आणि पाच अंडरपासचे उद्घाटन केले. 

पंतप्रधान मोदींची 'ती' कृती, सोशल मीडियावर VIDEO होतोय व्हायरल

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रगती मैदान इंटिग्रेटेड ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाचा (Pragati Maidan Integrated Transit Corridor Project) मुख्य बोगदा आणि पाच अंडरपासचे उद्घाटन केले. या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे. 

व्हायरल व्हिडिओत काय?
पंतप्रधानांनी प्रगती मैदान इंटिग्रेटेड ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाच्या मुख्य बोगद्याचे आणि पाच अंडरपासचे उद्घाटन केले.या उद्घाटनानंतर एक किस्सा घडला. मोदी कॉरिडॉरची पाहणी करताना एक अनोखं दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले. मोदी यांनी यांनी कागदाचे तुकडे आणि पाण्याची ब़ॉटल उचलली. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. मोदींच्या या कृतीची सर्व स्तरातून कौतूक होत आहे.  

प्रगती मैदान एकात्मिक ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्प हा प्रगती मैदान पुनर्विकास प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. संपूर्णपणे केंद्र सरकारच्या निधीतून उभारलेल्या या प्रकल्पासाठी 920 कोटी रुपये खर्च आला आहे.

Read More