Marathi News> भारत
Advertisement

आंध्रात विषारी गॅस गळतीने ६ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमधील अनंतपूर येथे स्टील कारखान्यात विषारी गॅस गळती झाली.  या दुर्घटनेत ६ जणांना मृत्यू झाला.

आंध्रात विषारी गॅस गळतीने ६ जणांचा मृत्यू

अनंतपूर : आंध्र प्रदेशमधील अनंतपूर येथे स्टील कारखान्यात विषारी गॅस गळती झाली. या विषारी वायुमुळे अनेकांना बाधा झाली. या दुर्घटनेत ६ जणांना मृत्यू झाला असून ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या पाचही जणांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 विषारी गॅस गळतीची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बचावकार्य सुरु केले आहे. अनंतपूर येथील ताडीपत्री भागात असणाऱ्या गेर्डाऊ स्टील इंडिया लिमिटेड या कारखान्यात विषारी वायूची गळती झाली आहे. गॅस गळतीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read More