Marathi News> भारत
Advertisement

घरात घुसून झोपलेल्या महिलांच्या डोक्यात घालायचा रॉड, मोडस ऑपरेंडी पाहून पोलीस चक्रावले, केली अटक; म्हणाले 'याला आता...'

चार महिन्यात अशा पाच घटना घडल्या आहेत. यामधील एका महिलेचा मृत्यू झाला असून, चार जणी जखमी आहेत. आरोपी अजय निशाद याच्यावर हत्येसह अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

घरात घुसून झोपलेल्या महिलांच्या डोक्यात घालायचा रॉड, मोडस ऑपरेंडी पाहून पोलीस चक्रावले, केली अटक; म्हणाले 'याला आता...'

उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी रात्री घरात घुसून झोपलेल्या महिलांच्या डोक्यावर वार करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. आतापर्यंत अशा पाच घटना घडल्या आहेत. यामधील एका महिलेचा मृत्यू झाला असून, चौघी जखमी आहेत. आरोपी अजय निशाद याच्यावर हत्येसह अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय निशाद याच्यावर 2002 मध्ये बाल लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. या प्रकरणी तो सहा महिने जेलमध्ये होता. जामीनावर सुटका झाल्यानंतर काही काळ तो सूरतमध्ये राहिला. यानंतर तो गोरखपूरमध्ये परतला होता. 30 जुलैला त्याने पहिला हल्ला केला. घरात घुसल्यानंतर त्याने महिलेच्या डोक्यावर वार केला आणि दागिने घेऊन पळ काढला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर गुन्हा करु इच्छिणाऱ्या अनेकांसाठी मोडस ऑपरेंडी मिळवून दिली. "त्याने चोरीपासून सुरुवात केली. यानंतर त्याने महिलेच्या डोक्यावर हल्ला केला. यानंतर त्याने ही मोडस ऑपरेंडी अवलंबण्यास सुरुवात केली," अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी गौरव ग्रोव्हर यांनी दिली आहे.

यानंतर 12 ऑगस्टला दुसरी घटना घडली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी त्याने केलेला हल्ला जास्त भयानक होता. हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर 26 ऑगस्ट, 10 नोव्हेंबर आणि 14 नोव्हेंबर अशा अनुक्रमे तीन घटना घडल्या असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या गुन्ह्यांमध्ये अजय निशादचा हात होता हे सिद्ध केल्याचं गौरव ग्रोव्हर यांनी सांगितलं आहे. "चौकशी केली असता त्याने सर्व घटनांचा उलगडा केला आहे. त्यानेच गुन्हा केला आहे हे सिद्ध कऱण्यासाठी आम्ही सर्व तक्रारदारांचे जबाबही नोंद करुन घेतले आहेत," अशी माहिती त्यांनी दिली आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, तक्रारदारांनी अजय निशादला घटनास्थळावरुन पळ काढताना पाहिलं आहे. "तक्रारदारांनी सांगितलं होतं की, तो तरुण असून नेहमी काळे कपडे घालतो आणि अनवाणी असतो. आम्ही लोकांची चौकशी केली आणि त्याआधारे संशयितांची ओळख पटवली," असं पोलीस म्हणाले आहेत.

पोलिसांना त्याच्याकडून लोखंडी रॉड, बेडचा लाकडी खांब सापडला आहे. यांचा हल्ल्यात वापर होत होता असा पोलिसांना संशय आहे. आम्ही हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेणार असून, अजय निशादसाठी कठोर शिक्षेची मागणी करु असं पोलीस म्हणाले आहेत. 

Read More