Marathi News> भारत
Advertisement

मसाज करायला गेला अन थेट सस्पेंड झाला, पोलीस अधिकाऱ्याचा VIDEO व्हायरल

मसाज करणं पोलीस अधिकाऱ्याला पडलं महागात

मसाज करायला गेला अन थेट सस्पेंड झाला, पोलीस अधिकाऱ्याचा VIDEO व्हायरल

Crime News : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये मसाज पार्लरच्या महिला कर्मचाऱ्यासोबत झालेल्या मारहाणीचं प्रकरण शांत झालं नाहीतर आणखी एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. पोलीस अधिकाऱ्याला मसाज पार्लरमध्ये महिला कर्मचाऱ्याकडून मसाज करून घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये-

या व्हिडिओमध्ये सुभाष चौराहा चौकी इथं ड्युटीवर असलेला पोलीस राकेश शर्मा युनिसेक्स मसाज पार्लरमध्ये महिलेकडून मसाज करून घेत असतो. राकेश शर्मा खुर्चीवर डोळे बंद करतो तेव्हा कोणीतरी लपून व्हिडीओ शूट करतं. व्हिडीओ बनवत असताना, मसाज करणारी महिलाही हसत असताना दिसत आहे.

मसाजच्या वेळी राकेश वर्मा हा वर्दीवर असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस एसएसपी शैलेश कुमार पांडे यांनी राकेश शर्माला निलंबित केलं आहे.  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी खूप शेअर, लाईक आणि कमेंट केले आहेत.

मसाज करून घेण्यात काय चूक आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.  पोलिसाने वर्दी घातलेली असताना मसाज करून नव्हती घ्यायला पाहिजे, अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. 

Read More