Women Suicide: हैदराबादच्या हिमायतनगर परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. 43 वर्षीय पूजा जैनने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. महिलेचा पती अरुण कुमार जैन ऑफिसला गेल्यानंतर तिने हे पाऊल उचलले आहे. पूजा जैन गेल्या काही दिवसांपासून अत्यंत धार्मिक आणि अध्यात्माकडे झुकलेली होती.
घटनास्थळी जेव्हा पोलिस पोहोचले तेव्हा त्यांना तिथे एक सुसाइड नोटदेखील सापडली होती. त्यात पूजाने लिहलं होतं की, देवाला भेटण्यासाठी आत्मबलिदान करतेय. सुसाइड नोटमध्ये तिने स्पष्ट केलंय की, हे पाऊल त्यांनी पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने उचलले आहे. जेणेकरुन ती देवाच्या जवळ जाऊ शकेल.
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,पूजा अलीकडे पूजा-पाठ, ध्यानधारणा आणि धार्मिक ग्रंथांमध्ये अत्यंत रस घेत होती. ती अनेकदा म्हणायची की तिला आता संसारातून मुक्ती हवीय आणि देवाला शरण जायचं आहे. तर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेचा तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, पूजाच्या मृत्यूमागे कोणी कट रचलाय का किंवा तिला कोणी आत्महत्येसाठी प्रवृत्त केलंय का? या अनुषंगानेही पोलिस तपास करत आहेत. तसंच, तिला काही मानसिक आजार होता का? त्याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र पूजाच्या आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली असून तिच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. पती कामावर जाताच पूजाने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे मोबाईल न देण्याच्या रागात 16 वर्षीय मुलांना डोंगरावरनं उडी मारून आत्महत्या केली आहे उडी मारताच हा मुलगा मृत्यूमुखी पडला मात्र मोबाईल मिळाला नाही म्हणून एका मुलांना आत्महत्या करणे यामुळे चांगलीच खळबळ उडालीये.
फक्त मोबाईल दिला नाही म्हणून रागावलेल्या 16 वर्षीय अथर्व तायडे या तरुणांन संभाजीनगरमध्ये डोंगरावरुन उडी मारून आत्महत्या केली आहे. मूळचा बुलढाण्याचा असलेला हा मुलगा आई-वडिलांसोबत संभाजीनगरच्या वाळूज परिसरात राहत होता. पोलीस भरतीचे प्रशिक्षण तो घेत होता. ्त्यांने आई-वडिलांकडे मोबाईलची मागणी केली मात्र आईना सध्या मोबाईल घेण्यास नकार दिला. त्याचाच राग मनात ठेवून मुलगा घरून निघाला थेट खवड्या डोंगरावर पोहोचला आणि उंचावरन उडी मारून त्यानं आत्महत्या केली यात मुलाचा जागीच मृत्यू झालाय.