Marathi News> भारत
Advertisement

Population Control Bill | योगी सरकारच्या लोकसंख्या विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल, काय म्हणाले?

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)  यांना लक्ष्य केलं आहे.

 Population Control Bill | योगी सरकारच्या लोकसंख्या विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल, काय म्हणाले?

हैदराबाद : उत्तर प्रदेश सरकार (Uttar Pradesh Government) राज्यातील लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा कमी अपत्य असणाऱ्या दामपत्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तर 2 पेक्षा अधिक मुलं असणाऱ्यांना शासकीय नोकरीपासून ते निवडणूक यावर काही निर्बंध घालण्यात येणार आहे. योगी सरकारच्या या उत्तर प्रदेश लोकसंख्या विधेयकावरुन (Population Control Bill) एमआयएमचे सर्वेसर्वा (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) असदुद्दीन ओवैसीने  (Asaduddin Owaisi)  हल्लाबोल केला आहे. तसेच अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. (Population Control Bill More than 2 children of 150 BJP MLAs in uttar pradesh says mim chief said Asaduddin Owaisi)  

औवेसी काय म्हणाले?  

"यूपीतील 150 पेक्षा अधिक भाजप आमदारांना 2 पेक्षा अधिक मुलं आहेत. भाजप त्यांचंही तिकीट कापणार का," असा सवाल ओवैसी यांनी उपस्थित केला. ओवैसी  योगींना आव्हान देताना म्हणाले की, "मी डिबेट करायला तयार आहे. यूपी सरकार पूर्णपणे अपयशी ठरली आहे".

सरकार रोजगार का देत नाही?

"कोरोना काळात देशाची वाईट स्थिती झाली. अनेक तरुणांनी आपला रोजगार गमावला. अशा बेरोजगार तरुणांना सरकार रोजगार का देत नाही", असा सवालही ओवैसी यांनी उपस्थित केला.

Read More