Marathi News> भारत
Advertisement

दररोज फक्त 416 रूपयांच्या बचतीने व्हाल करोडपती... वाचा पोस्ट ऑफिसची 'ही' भन्नाट स्किम

पोस्ट ऑफिसच्या विविध योजनाच्या आधारे तूम्ही गुंतवणूक करू शकता.

दररोज फक्त 416 रूपयांच्या बचतीने व्हाल करोडपती... वाचा पोस्ट ऑफिसची 'ही' भन्नाट स्किम

Post Office Scheme : तूम्हाला गुंतवणूक करून त्यातून चांगला परतावा मिळावयाचा आहे पण त्यात तूम्हाला सुरक्षिततेची हमी नाही असं वाटतं तर मग तूम्हा पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये पैसे गुंतवायला हवेत. पोस्ट ऑफिसच्या स्किममधून तूम्हाला चांगला परतावा मिळेल आणि तूम्ही यातून सुरक्षित गुंतवणूकही करू शकता. 

पोस्ट ऑफिसच्या विविध योजनाच्या आधारे तूम्ही गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक स्किम्स आहेत ज्या तूम्हाला चांगला परतावा देतात. जर तूमच्याकडे चांगला वेळ असेल तर तूम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करू शकता. 

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेतून वार्षिक व्याज 7.1 % एवढे असते. या योजनेची maturity 15 वर्षांची आहे. पण त्यातूनही पुढे ही योजना पुढील पाच वर्षांसाठी वाढवली जाऊ शकते. जर तूम्ही 15 वर्षांची काळ नको असेल तर तूम्ही या फंडचा अवधी वाढवू शकता आणि त्याप्रमाणे तूम्हाला व्याजाचा फायदा होईल. 

वर म्हटल्याप्रमाणे पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये 15 वर्षांचा maturity period आहे. या योजनेत तूम्ही प्रतिवर्षी 1.50 लाख रूपयांची गुंतवणूक करू शकता किंवा महिन्याला 12500 रूपये इतकी गुंतवणूक करू शकता. 

या योजनेत 22.5 लाख रूपयांच्या गुंतवणूकीवर 18 लाख रूपयांचा व्याज मिळतो कारण 15 वर्षांनंतर 1.50 लाख रूपयांची गुंतवणूक 22.5 लाख रूपयांपर्यंत पोहचते. ज्यावर तूम्हाला 7.1 % एवढे वार्षिक व्याज मिळते. त्यामुळे एकूण maturity period नंतर तूमच्या हातात 40.70 लाख रूपये येतात ज्यात तूम्हाला 18.20 लाख रूपयांचे व्याज मिळते. 

Read More