Marathi News> भारत
Advertisement

Indian Post Office सुपरहिट योजना! 10 हजार गुंतवा आणि मिळवा 16 लाखांचा फायदा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

पोस्ट ऑफिस हे सरकारी असल्यामुळे यामध्ये पैशाची हमी देखील असते.

Indian Post Office सुपरहिट योजना! 10 हजार गुंतवा आणि मिळवा 16 लाखांचा फायदा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : बऱ्याच लोकांना त्याचे पैसे गुंचतवायचे असतात. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने पैशांची गुंतवणूक ही फारच जोखमीची आहे. त्यामुळे बऱ्याचदा लोकं पैशांची गुंतवणूक करायला घाबरतात. जर बँकेत पैसे ठेवायला जावं तर, त्यावरती व्याज फार कमी मिळतं, म्हणून बऱ्याचदा लोकं असं करणं टाळतात. परंतु पोस्ट ऑफीसने एक चांगली योजना आणली आहे, ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवूण जास्त फायदा मिळवू शकता. तसेच पोस्ट ऑफिस हे सरकारी असल्यामुळे यामध्ये पैशाची हमी देखील असते.

पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. यामध्ये रिस्क फॅक्टरही कमी आहे आणि त्याच वेळी रिटर्नही चांगला मिळतो. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट स्कीम हा त्यापैकी एक गुंतवणुकीचा मार्ग आहे.

पोस्ट ऑफिस आरडीमध्ये गुंतवणूक कशी सुरू करावी?

पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट खाते ही चांगली व्याजदरासह लहान हप्ते जमा करण्याची सरकारी हमी योजना आहे, यामध्ये तुम्ही फक्त 100 रुपयांच्या छोट्या रकमेतून गुंतवणूक सुरू करू शकता. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही, तुम्ही त्यात हवे तेवढे पैसे टाकू शकता.

या योजनेचे खाते पाच वर्षांसाठी उघडले जाते. तथापि, बँका सहा महिने, 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षांसाठी आवर्ती ठेव खात्यांची सुविधा देतात. त्यात जमा केलेल्या पैशावर प्रत्येक तिमाहीत (वार्षिक दराने) व्याज मोजले जाते आणि प्रत्येक तिमाहीच्या शेवटी ते तुमच्या खात्यात जोडले जाते.

तुम्हाला किती व्याज मिळेल ते जाणून घ्या

सध्या, रिकरिंग डिपॉजिट स्कीम वर  5.8% व्याज उपलब्ध आहे, भारत सरकार प्रत्येक तिमाहीत आपल्या सर्व लहान बचत योजनांचे व्याजदर निश्चित करते.

- दरमहा 10 हजार रुपये गुंतवले

- व्याज 5.8%

- परिपक्वता-10 वर्षे

- 10 वर्षानंतरची मॅच्युरिटी रक्कम =16 लाख 28 हजार 963  रुपये

दर महिन्याला 10 हजार टाकले तर 16 लाख मिळतील

जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 5.8% दराने 16 लाखांपेक्षा जास्त रुपये मिळतील.

Read More