Marathi News> भारत
Advertisement

PPF खात्याच्या नियमात मोठा बदल, हे जाणून घेणं प्रत्येकासाठी महत्वाचं

तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक केली असेल किंवा असा विचार करत असाल, तर सरकारचे हे नवीन नियम जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे.

PPF खात्याच्या नियमात मोठा बदल, हे जाणून घेणं प्रत्येकासाठी महत्वाचं

मुंबई : भविष्य निर्वाह निधी खाते (PPF Account) धारकांसाठी एक मोठी बातमी आहे. आपल्यापैकी बरेच असे  लोक आहेत. जे PPF खात्यामध्ये पैसे जमा करतात. ज्याचा आपल्याला निवृत झाल्यानंतर फायदा मिळतो. परंतु आता या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने या खात्यांसंदर्भात नियम बदलले आहे. त्यामुळे जर तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक केली असेल किंवा तुम्ही पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर सरकारचे हे नवीन नियम जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. सरकारच्या या नवीन नियमांचा थेट परिणाम खातेदारांवर होणार आहे. त्यामुळे हा नक्की असा काय नियम आहे आणि त्यातील बदल काय आहे हे काळजीपूर्वक जाणून घ्या.

माहिती देताना, अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, 12 डिसेंबर 2019 रोजी किंवा त्यानंतर, जर एकाच व्यक्तीचे 2 खाती PPF उघडली असतील किंवा यापेक्षा जास्त पीपीपी खाती असतील, तर ती खाती विलीन किंवा मर्ज होऊ शकणार नाहीत.

फक्त 1 खातं सक्रीय असेल

सरकारने जारी केलेल्या ओएममध्ये असे सांगण्यात आले आहे की, 12 डिसेंबर 2019 नंतर उघडलेल्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त खात्यांपैकी फक्त एकच पीएफ खातं सक्रिय ठेवलं जाईल. याशिवाय दुसरे अक्विट खाते बंद करण्यात येईल.

याचाच अर्थ असा की, तुमच्या पूर्वीच्या खात्यावर तुम्हाला व्याज मिळणार नाही. याशिवाय कोणत्याही बंद खात्यावर व्याज दिले जाणार नाही, अशी माहिती सरकारने दिली.

पब्लिक प्रोविडंट फंड (PPF)

PPF खातेधारकांसाठी किमान शिल्लक रुपये 500 आहे म्हणजेच तुम्हाला त्यात दरवर्षी किमान 500 रुपये गुंतवावे लागतील, अन्यथा तुमचे खाते बंद केले जाईल. यामध्ये पैसे टाकण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे, त्यामुळे तुमच्या खातात किमान शिल्लक नसेल, तर तुम्ही त्यात पैसे टाका, म्हणजे तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. जर तुम्ही शेवटच्या तारखेपर्यंत पैसे जमा केले नाहीत, तर तुम्हाला प्रति वर्ष 50 रुपये दंड भरावा लागेल.

Read More