Marathi News> भारत
Advertisement

भयंकर अपघात! महाकुंभच्या दिशेनं जाणाऱ्या बोलेरोला बसची धडक; कारमधील सर्व 10 प्रवाशांचा मृत्यू

संगमनगरी प्रयागराजमध्ये कार- बसचा भीषण अपघात; महाकुंभच्या वाटेवर मृत्यूनं गाठलं. प्रयागराजमधील या भीषण अपघातानं सारेच हळहळले...   

भयंकर अपघात! महाकुंभच्या दिशेनं जाणाऱ्या बोलेरोला बसची धडक; कारमधील सर्व 10 प्रवाशांचा मृत्यू

Prayagraj Road Accident: महाकुंभच्या (Mahakumbh 2025) निमित्तानं सध्या संगमनगरी (Sangamnagri) अशी ओळख असणाऱ्या प्रयागराज इथं कोट्यवधींच्या संख्येनं भाविकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. याच संगमनगरीत एक भीषण अपघात झाल्याचं वृत्त समोर येत असून, या अपघातात 10 जणांचा मृत्यू ओढावल्याचंही सांगण्यात येत आहे. 

उत्तर प्रदेशातील मेजा इथं प्रयागराज मिर्जापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा बोलेरो कार आणि बस एकमेकांवर आदळल्या आणि हा भीषण अपघात झाला. कार आणि बसमधील ही टक्कर इतकी भयावह होती की, बोलेरो कारमध्ये असणाऱ्या सर्व 10 प्रवाशांचा या घटनेत मृत्यू ओढावला. तर, 19 जण गंभीररित्या जखमी झाले.  हे सर्व छत्तीसगढच्या कोरबा जिल्ह्यातील रहिवासी होते असं सांगितलं जातं. 

अपघातानंतर समोर आलेल्या माहितीनुसार बोलेरो कारमधील 10 प्रवासी संगम स्नानासाठी कुंभमेळ्याच्या ठिकाणी जात होते, पण वाटेतच नियतीनं त्यांच्यावर घाला घातला. तर, बसमधील प्रवासी संगम स्नानानंतर वाराणासीच्या दिशेनं निघाले होते. हे सर्व प्रवासी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील रहिवासी होते. या अपघातानंतर जखमींना तातडीनं सीएचसी रामनगरमध्ये दाखल करण्यात आलं. 

हेसुद्धा वाचा : Mumbai Local News : रविवारी लोकल प्रवासाचा विचारही नको; मध्य, पश्चिम रेल्वेसह हार्बर मार्गावर मेगाब्लॉक 

 

हा अपघात इतक्या भीषण स्वरुपाता होता की, रात्री उशिरा घडलेला प्रकार पाहणाऱ्यांचाही थरकाप उडाला. अपघातात जीव गमावलेल्यांचे मृतदेह ताब्यात घेत ते शवविच्छेदनासाठी पाठवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृतांमध्ये सर्व व्यक्ती पुरुष असून, त्यांचं वय अंदाजे 25 ते 45 दरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे. 

Read More