Saffron Priced Increased : पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 जणांचा जीव गेला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अनेक पाकिस्तानाविरोधात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ज्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय होता की, भारताने अटारी सीमा बंद केली आहे. त्यानंतर इथून आयात करण्यात येणारा मसाल्यावरही रोख लावली आहे. या निर्णयानंतर भारतातील या मसाल्याचे भाव वधारले. 50 ग्रॅम सोन्यापेक्षा जास्त महाग हा मसाला महाग झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत दररोज विक्रम करत आहेत. अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचा भाव 1 लाखांवर गेला होता. तर 1 किलो चांदीची किंमतदेखील 96000 रुपयांवर गेला होता. सोन्यापेक्षा कोणता मसाला महाग झाला हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अटारी-वाघा सीमेवरून होणारा व्यापार थांबवला आहे. त्याचा परिणाम केशर या मसाल्यावर झाला आहे. केशर प्रति किलो 5 लाखांवर गेला आहे.
भारतात होणाऱ्या केशरच्या आयातीवर परिणाम झाल्यामुळे त्याची किंमत झपाट्याने वाढत आहे. अटारी सीमा बंद झाल्यापासून, अफगाणिस्तानातून केशर आयात होत नाही आहे. त्यामुळे अवघ्या 4 दिवसांत त्याच्या किंमतीत 10 टक्क्यांनी वाढ पाहिला मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवादी हल्ल्यानंतर उच्च दर्जाच्या केशरची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली आहे, तर हल्ल्यापूर्वी केशरची किंमत 4.25 लाख ते 4.50 लाख रुपयांच्या दरम्यान पाहिला मिळाली होती. याचा अर्थ असा की, अवघ्या 2 आठवड्यातच केशरच्या किमतीत 50 हजार रुपयांची वाढ झाली आहे. केशर हा एकमेव असा मसाला आहे जो समुद्रसपाटीपासून 1800 मीटरपेक्षा जास्त उंचीवर पिकवता जात असतो.
किरकोळ आणि घाऊक विक्रेत्यांना पुरवठा उपलब्ध नसल्यामुळे अडचणी येत आहेत. विशेषतः उच्च दर्जाचे केशर जे पाकिस्तानमार्गे बंद जमिनीच्या मार्गाने भारतात येत होते. भारतात दरवर्षी सुमारे 55 टन केशर वापरले जाते. त्याचा एक भाग काश्मीरमधून येतो, जो त्याच्या उत्तम केशरसाठी ओळखला जातो. काश्मीरमध्ये केशर उत्पादन दरवर्षी फक्त 6 ते 7 टन असतं. अर्थात, उर्वरित वापर पूर्ण करण्यासाठी आपल्याला आयातीवर अवलंबून राहावे लागते. ही आयात अफगाणिस्तान आणि इराणमधून केली जाते. अफगाणिस्तानातील केशर त्याच्या रंग आणि सुगंधासाठी खूप प्रसिद्ध आहे, तर इराणमधून येणारा केशर खूपच कमी किमतीचा आहे. काश्मीरमधील पुलवामा, श्रीनगर, पंपोर, बडगाम आणि जम्मूमधील किश्तवाड भागात केशराची लागवड केली जाते.
अहवालात म्हटलं आहे की अफगाणिस्तानातील पुरवठा थांबल्यामुळे इराणी केशरच्या किमतीत देखील 5% वाढ झाली आहे. बाजारात साधारणपणे केशरचे तीन मुख्य प्रकार उपलब्ध आहेत.
मोंगरा (काश्मीरी) – गडद लाल रंग, सर्वात मजबूत चव आणि सर्वात जास्त किंमत
लाचा (काश्मिरी) - यात काही समान शैली आहे परंतु थोडी कमी ताकद आहे.
पुशल (अफगाण, इराणी) – हलक्या रंगाचे केस, थोडे पिवळे, अधिक परवडणारे