Marathi News> भारत
Advertisement

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा प्रचारासाठी कर्नाटकात

 कर्नाटकमध्ये मोदींच्या १५ सभा होणार होत्या. मात्र नंतर २१ सभा घेण्याचा निर्णय मोदींनी घेतलाय.

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा प्रचारासाठी कर्नाटकात

कर्नाटक : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. याच प्रचाराच्याअंतिम टप्प्यात पंतप्रधान मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. मोदींच्या यांच्या प्रचारसभेचा तिसरा दिवस आहे. उत्तर कर्नाटक, ओल्ड म्हैसुर आणि करावळी कर्नाटकमधील तुमकुर, गदग, शिवमोगा आणि मंगळुरमध्ये मोदींच्या सभा होणार आहेत. सुरुवातीला कर्नाटकमध्ये मोदींच्या १५ सभा होणार होत्या. मात्र नंतर २१ सभा घेण्याचा निर्णय मोदींनी घेतलाय. दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या याच्या मतदारसंघात धडक मारणार आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा परंपरागत असणा-या म्हैसुर जिल्ह्यातील वरुणा विधानसभा मतदारसंघात प्रचार करणार आहेत.

सभा आणि रोडशो 

वरुणा विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मुलगा डॉ. यथेंद्रा निवडणुक रिंगणात आहेत. त्यानंतर प्रियपट्टण, कृष्णराजनगर, नृसिंम्हा राजा, रामराजा मतदारसंघात सभा आणि रोडशो करणार आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे अमित शहा यांच्यावर कडाडुन टिका करत आहेत. त्या पार्श्वभुमीवर अमित शहा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कसं लक्ष करतात याकडं सर्वाचच लक्ष लागून राहिलंय.

Read More