Marathi News> भारत
Advertisement

केरळच्या गुरुवायुर कृष्ण मंदिरात पंतप्रधान मोदी दाखल

केरळच्या त्रिसूरमध्ये दाखल झाल्यानंतर गुरुवायुर श्रीकृष्ण मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजाही करणार आहेत

केरळच्या गुरुवायुर कृष्ण मंदिरात पंतप्रधान मोदी दाखल

नवी दिल्ली : दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. मोदी मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. दौऱ्याला रवाना होण्याआधी मोदी केरळमध्ये पोहोचलेत. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदींचा केरळचा पहिला दौरा आहे. केरळच्या प्रसिद्ध गुरुवायूर मंदिरात मोदी पूजाअर्चा करतील. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांकडून आयोजित अभिनव सभेला मोदी संबोधित करणार आहेत. केरळहून मोदी आधी मालदीवला आणि नंतर श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 

केरळच्या त्रिसूरमध्ये दाखल झाल्यानंतर गुरुवायुर श्रीकृष्ण मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजाही करणार आहेत. कमळाच्या फुलांसहीत मोदी ही पूजा करणार आहेत.

Read More