Marathi News> भारत
Advertisement

Heart Specialist असल्याचं सांगून केलं 7 जणांचं ऑप्रेशन; सातही जण महिन्याभरात दगावल्याने फुटलं बिंग

Fake Doctor Performs Surgeries Causes 7 Deaths: या डॉक्टरने आपण मूळचे ब्रिटनमधील असल्याचा दावा केला होता आणि तो अशीच आपली ओळख करुन द्यायचा.

Heart Specialist असल्याचं सांगून केलं 7 जणांचं ऑप्रेशन; सातही जण महिन्याभरात दगावल्याने फुटलं बिंग

Fake Doctor Performs Surgeries Causes 7 Deaths: बोगस आणि बनावट डॉक्टरांच्या अनेक बातम्या तुम्ही यापूर्वी वाचल्या असतील किंवा ऐकल्या असतील. त्याचप्रमाणे कम्पाऊण्डर किंवा योग्य शिक्षण नसलेल्या व्यक्तींनी शस्त्रक्रिया केल्याच्या बातम्याही अनेकदा समोर येतात. सध्या मध्य प्रदेशमध्ये समोर आलेल्या एका बातमीमुळे खळबळ उडाली आहे. येथील एका कथित डॉक्टरमुळे सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

कोण आहे हा नकली डॉक्टर?

मिळालेल्या माहितीनुसार, हा सारा प्रकार मध्य प्रदेशमधील दमोह जिल्ह्यात घडला आहे. येथे एका कथित बनावट डॉक्टरने 7 रुग्णांवर शस्त्रक्रिया केली आहे. मात्र या सातही रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका खासगी मिशीनरी रुग्णालयात हा प्रकार घडला असून कथित बनावट डॉक्टरचे नाव नरेंद्र विक्रमादित्य यादव असं आहे. नरेंद्र त्याचं नाव बदलून येथील लोकांना आपण डॉक्टर असल्याचे भावसत होता. 

एका महिन्यात 7 जण दगावले

आपला जन्म आणि शिक्षण हे मूळचे ब्रिटनचे असल्याचा दावा नरेंद्र विक्रमादित्य यादव करायचा. त्याने स्वत:चं नाव डॉक्टर एन जॉन केम असे सांगितले होते. याच नावाने तो अनेकांना भेटायचा. आपण हार्ट स्पेशलिस्ट डॉक्टर असल्याच सांगत त्याने एकूण 7 रुग्णांवर हृदयासंबंधी शस्त्रक्रिया केली. यात या सर्वच्या सर्व रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका महिन्यात या डॉक्टरने ऑप्रेशन केलेले सात रुग्ण दगावले

...त्यानंतर करण्यात आली चौकशी

ब्रिटनमधील प्रसिद्ध डॉक्टर असल्याचे सांगत त्याने ख्रिश्चन मिशनरीच्या रुग्णालयात नोकरी मिळवली होती. तो हृदयरोग तज्ज्ञ म्हणून येथे रुग्णांवर उपचार करायचा. नोकरी मिळाल्यानंतर त्याने अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. नरेंद्र यादवने ज्या-ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया केली, त्या सर्वांचाच नंतर मृत्यू झाला. एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर डॉक्टरच्या वैद्यकीय शिक्षणाबाबत चौकशी करण्यात आली. या चौकशीत या व्यक्तीचे नाव एन जॉन केन नसून नरेंद्र यादव असे असल्याचं समोर आले. या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रॅकेटमध्ये इतर लोकांचा समावेश?

सदर प्रकरणात नरेंद्रविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता असून रुग्णालयाविरुद्धही योग्य चाचपणी न करता अशाप्रकारे व्यक्तीला नोकरीवर ठेवल्याच्या मुद्द्यावरुन कारवाई होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या रॅकेटमध्ये अजून कोणाकोणाचा समावेश आहे याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

Read More