मुंबई : पंजाबच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळ-जवळ समोर आला आहे. ज्यामध्ये उभे असलेले नवज्योतसिंग सिद्धू यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. नवज्योतसिंग सिद्धू हे काँग्रेसकडून उभे राहिले होते. परंतु त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या आम आदमी पार्टीच्या उमेदवार जीवन ज्योत कौर विजयी झाल्या आहेत. या पराभवानंतर नवज्योतसिंग सिद्धू आता अर्चना पूरन सिंग यांच्या खुर्चीवर हक्क गाजवणार अशा बातम्या समोर येत आहेत.
विशेष म्हणजे सिद्धूच्या पराभवानंतर अर्चना पूरण सिंह अचानक ट्विटरवर ट्रेंड करू लागल्या आहेत. त्यामागचं कारण आहे, त्यांची सीट. नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाबमधील सीट मिळाली नाही म्हणून ते आता अर्चनाची सीट घेतील का? असा लोकांनी प्रश्न उपस्थीत केला आहे.
यासंदर्भात लोक वेगवेगळ्या प्रकारचे मजेदार मीम्स शेअर करत आहेत. खरेतर 'द कपिल शर्मा शो'मध्ये अर्चनाच्या जागी नवज्योत सिंग सिद्धूची निवड करण्यात आली होती आणि ते त्या सीटवर बसाचे, जेथे आज अर्चना आपल्याला पाहायला मिळत आहे.
परंतु पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सिद्धू यांना कपिलच्या शोमधून काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर शोमध्ये त्यांची जागा अर्चना पूरण सिंहने घेतली.
याआधी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर त्यांची खूप चर्चा झाली होती, त्यावर अर्चनाने तिची प्रतिक्रिया दिली होती. ETimes शी झालेल्या संभाषणात अर्चनाला तिच्या आणि कपिलच्या शोवर बनवल्या जाणार्या मीम्सबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ती म्हणाली – 'माझ्यावर अनेक वर्षांपासून असे विनोद होत आहेत, पण मी त्याची पर्वा केली नाही किंवा मी कधीच ते गांभीर्याने घेतले नाही. सिद्धूला शोमध्ये परत यायचे असेल, तर माझ्याकडे इतर अनेक असाइनमेंट आहेत, ज्या मी गेल्या अनेक महिन्यांत नाकारल्या होत्या.'
#PunjabElections2022
— Jam Kisan (@JamKisan1) March 10, 2022
after #Siddhu ji trailing in election , Archana ji is worried ,
Ab judge ki kursi khatre me hai#archanapuransingh pic.twitter.com/UAcaJdRLuU
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून 'द कपिल शर्मा शो' लोकांचे मनोरंजन करत आहे. हा शो कपिल शर्मा होस्ट करत आहे. त्याचवेळी कृष्णा अभिषेक, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर, किकू शारदा आणि सुदेश लाहिरी सारखे स्टार्स वेगवेगळ्या पात्रांमध्ये लोकांना हसवताना दिसत आहेत. यापूर्वी सुनील ग्रोव्हर आणि असगर अली देखील या शोचा भाग असायचे पण कपिलसोबत वाद झाल्यानंतर त्यांनी शो सोडला.