Marathi News> भारत
Advertisement

अरे याला आवरा कोणीतरी! अजगरासोबत करतोय बाथटमध्ये 'अभ्यंगस्नान', Video व्हायरल

बाथटपमध्ये अजगरासोबत अंघोळ करताना कोणाला पाहिलं आहे का? 

अरे याला आवरा कोणीतरी! अजगरासोबत करतोय बाथटमध्ये 'अभ्यंगस्नान', Video व्हायरल

Shocking Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपण व्हायरल झालेले पाहतो. यामध्ये काही व्हिडीओ असे असतात की आपण कल्पनाही करू शकत नाही. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये एक माणूस बाथटपमध्ये अजगरासोबत अंघोळ करत असल्याचं दिसत आहे. साधा रस्त्यावर साप दिसला तर जी खालीवर होतो. (python dangerous snake bathing in bathtub with man shocking viral video Marathi News)

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाथटबमध्ये आरामात पडून असल्याचे दिसून येते. व्हिडीओमध्ये बारकाईने पाहिल्यास त्या व्यक्तीजवळ एक धोकादायक काळा अजगर दिसतो. असे असूनही ती व्यक्ती अजिबात घाबरत नाही. सर्वप्रथम, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुम्हीही पाहा.

 

अजगर हळूहळू रांगणाऱ्या व्यक्तीच्या पायावर चढतो, पण त्या व्यक्तीला फारसा फरक पडत नाही. व्हिडीओ पाहून असे वाटते की, माणूस आणि अजगर यांच्यात खूप जुनी मैत्री आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा व्हिडीओ अवघ्या काही वेळातच अनेक वेळा पाहिला गेला आहे. आत्तापर्यंत हजारो लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. 

Read More