Rahul Gandhi News : लोकसभेचे (Loksabha Election 2024) विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कोल्हापुरात हजेरी लावत तिथं सामान्यांच्या घरी जाऊन त्यांनाही थक्क केलं. खुद्द राहुल गांधी आपल्या घरात आले आहेत याचा आनंदही त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. सनदे कुटुंबासोबत संवाद साधत, त्यांचं राहणीमान आणि त्यांची खाद्यसंस्कृती राहुल यांनी अतिशय जवळून पाहिली आणि त्यांना यात साथ मिळाली ती म्हणजे, शाहू पटोले यांची.
इथं सत्ताधारी त्यांच्या परीनं जनमाससाशी संपर्क साधतानाच राहुल गांधी यांनी त्यांच्या सहजपणानं आणि साधेपणानं 'खाने पे चर्चा' करत सर्वांची मनं जिंकली. स्वयंपाकघरात मदत केली आणि गप्पागोष्टी करत जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी जेवणातील काही पदार्थांमध्ये सहाजिकच कोल्हापुरचा ठसका असल्यामुळं राहुल गांधी यांनी अनोख्या पद्धतीनं आहारातील हा बदलही सुचवला.
या अतिशय वेगळ्या अनुभवाविषयी बोलतानाचा एक व्हिडीओ आणि त्यांचं मत त्यांनी X च्या माध्यमातून मांडली.
''दलितांची खाद्यसंस्कृती आणि त्यांच्या आहाराविषयी खुप कमी लोक जाणतात. शाहू पटोले यांच्या म्हणण्यानुसार 'दलित काय खातात कोणालाही ठाऊक नसतं'. ते काय खातात, काय शिजवतात, कसं शिजवतात, त्याचं सामाजिक आणि राजकीय महत्त्वं काय आहे या अनेक कुतूहलपूर्म प्रश्नांच्या बळावर मी आज तुकाराम सनदे आणि अंजना सनदे यांच्यासोबत काही क्षण व्यतीत केले'', असं त्यांनी सांगितलं.
दलित किचन के बारे में आज भी बहुत कम लोग जानते हैं। जैसा शाहू पटोले जी ने कहा, “दलित क्या खाते हैं, कोई नहीं जानता।”
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 7, 2024
वो क्या खाते हैं, कैसे पकाते हैं, और इसका सामाजिक और राजनीतिक महत्व क्या है, इस जिज्ञासा के साथ, मैंने अजय तुकाराम सनदे जी और अंजना तुकाराम सनदे जी के साथ एक दोपहर… pic.twitter.com/yPjXUQt9te
हरभऱ्याची भाजी, तुरीची डाळ, वांग आणि भाकरी... असा बेत राहुल गांधी यांच्यासाठी आखण्यात आला होता. या जेवणावेळी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चाही झाली. जिथं समाजाकडून मागासवर्गीयांना मिळणारी वागणूक आणि इतर काही मुद्देही प्रकाशात आले. अतिशय आपुलकीनं राहुल गांधी यांनी सनदी कुटुंबाशी संवाद साधत त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांची खाद्यसंस्कृती हा महत्त्वाचा दुवा होता ही महत्त्वाची बाब.