Marathi News> भारत
Advertisement

मोदींनी अंबानींना ३० हजार कोटी दिले, राहुल गांधींचा आरोप

मोदी सरकारविरोधात विरोधकांनी उघडलेल्या मोहिमेला आणखी बळ

मोदींनी अंबानींना ३० हजार कोटी दिले, राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्ली : राफेल खरेदीप्रकरणी दिवाळखोर अनिल अंबानींना ३० हजार कोटी देऊन देशाच्या पंतप्रधानांनी सरळसरळ भ्रष्टचार केल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी केलाय. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आजपासून तीन दिवस फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत.  नेमक्या आजच सीतारमण यांना फ्रान्सला का जावं लागतंय असा सवाल राहुल गांधींनी केलाय. राफेल विमान खरेदीप्रकरणी फ्रान्सच्या एका वृत्तपत्रानं मोठा गौप्यस्फोट केलाय. त्याचा आधार राहुल गांधींनी घेतलाय. 

'दसॉल्ट एव्हिएशन' कंपनीला राफेल विमान विक्रीआधी रिलायन्ससोबतचा करार बंधनकारक केल्याचा दावा, दसॉल्टच्या अधिकाऱ्यांनी केलाय.

 

फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनीही भारतानं रिलायन्सशी करार बंधनकारक होता, असं विधान याच वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं.

ओलांद यांच्या विधानावर केंद्रातील मोदी सरकारनं स्पष्टीकरण देताना असा कुठलाही दबाव फ्रान्सच्या दसॉल्टवर नव्हता असं म्हटलं होतं. 

आता दसॉल्टच्या हवाल्यानं तोच मुद्दा पुन्हा पुढे आल्यानं मोदी सरकारविरोधात विरोधकांनी उघडलेल्या मोहिमेला आणखी बळ मिळालंय.

Read More