Marathi News> भारत
Advertisement

बजेटचं वाचन सुरू असताना खासदार राहुल गांधी काय करत होते पाहा फोटो...

अर्थमंत्र्यांच्या घोषणा लक्षपूर्वक ऐकत होते. मात्र त्याच वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं काहीतरी वेगळंच चालू होतं. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

बजेटचं वाचन सुरू असताना खासदार राहुल गांधी काय करत होते पाहा फोटो...

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी बजेट 2022 लोकसभेत सादर केलं. 6 वर्षांपासून चालत आलेला टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. याशिवाय कपडे मोबाईल-चार्जर स्वस्त होणार आहे. याशिवाय अनेक जनतेच्या हिताचे निर्णय यंदाच्या बजेचमध्ये घेण्यात आले. यावेळी बजेटचं वाचन सुरू असताना राहुल गांधीचे हावभाव कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

2022 च्या बजेटमध्ये जनतेसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. सभागृहात उपस्थित असलेले सर्व खासदार अर्थमंत्र्यांच्या घोषणा लक्षपूर्वक ऐकत होते. मात्र त्याच वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं काहीतरी वेगळंच चालू होतं. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

बजेटचं वाचन सुरू असताना राहुल गांधी यांनी आपल्या डोक्याला हात लावला. हे बजेट त्यांना समजत नाही म्हणून त्यांनी डोक्याला हात लावला की आता काय करायचं हा प्रश्न त्यांच्या समोर होता म्हणून त्यांनी डोक्याला हात लावला असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर युजर्सकडून विचारले जात आहेत.

राहुल गांधींनी डोक्याला हात मारल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर अनेक मीम्स देखील तयार झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांच्या या फोटोमुळे राहुल गांधी चांगलेच ट्रोल झाले आहेत. केरळमधील वायनाडचे खासदार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना ट्विटरवर ट्रोल केलं जात आहे.

Read More