Marathi News> भारत
Advertisement

गोव्यामध्ये गर्लफ्रेंडसोबत सुट्टी घालवतोय अभिनेता राजकुमार राव

बॉलिवूडचं बेस्ट कपल म्हणून ओळख

गोव्यामध्ये गर्लफ्रेंडसोबत सुट्टी घालवतोय अभिनेता राजकुमार राव

गोवा : अभिनेता राजकुमार राव सध्या आपली गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत समुद्र किनाऱ्यावर एंजॉय करतो आहे. दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचं झालं तर दोघांनीही सिटी लाईटमध्ये काम केलं होतं. यानतंर दोघांमध्ये जवळीकता वाढली आणि मग प्रेम झालं. सध्या तो वेळ काढून पत्रलेखासोबत गोव्याला आलो आहे असं म्हणतोय.

fallbacks

दोघांना लग्नाविषयी नेहमी प्रश्न केले जातात. पत्रलेखाला सगळ्यात बेस्ट कपल मानलं जातं. तिने कधीच आपलं नातं चोरुन ठेवलं ऩाही. पत्रलेखा काही दिवसांपूर्वी नानू की जानूमध्ये दिसली होती. तर राजकुमार राव स्त्री सिनेमातून काही श्रद्धा कपूरसोबत नुकताच झळकला होता. लवकरच त्याचे आणखी काही सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. नुसरत भरूच सोबत तुर्रम खानमध्ये राजकुमार राव दिसणार आहे. तर मेड इन चाईनामध्ये मौनी रॉयसोबत तो भूमिका करणार आहे.

fallbacks

मेंटल है क्या आणि एक लडकी को देखा तो ऐसा लगा या सिनेमातून देखील राजकुमार राव लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार रावचा सिनेमा 5 वेडिंग देखील काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता पण बॉक्स ऑफिसवर सिनेमा काही खास करु शकला नाही.

fallbacks

Read More