Marathi News> भारत
Advertisement

राखी सावंतने दिली 'जय पाकिस्तान' घोषणा; मनसे म्हणाली 'हिला हाकलवून लावा', VIDEO व्हायरल

Rakhi Sawant's Controversial Statement on Pakistan: राखी सावंतनं दिल्या 'जय पाकिस्तान' घोषणा, मनसेनं दिला इशारा

राखी सावंतने दिली 'जय पाकिस्तान' घोषणा; मनसे म्हणाली 'हिला हाकलवून लावा', VIDEO व्हायरल

Rakhi Sawant's Controversial Statement on Pakistan: अभिनेत्री राखी सावंत ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिचं खासगी आयुष्य तर कधी कोणत्या शोमध्ये ती दिसते तेव्हा ती जे काही करते त्याची चर्चा रंगते. तिचे व्हिडीओ पाहता अनेकदा ती ट्रोलिंगचा शिकार होते तर कधी नेटकरी तिची मज्जा घेताना दिसतात. अशात आता राखी सावंतचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केल्यानंतर आता राखीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राखी सावंत ही पाकिस्तानचा जयघोष करताना दिसते. त्यामुळे अचानक राखी सावंतला पाकिस्तानचा पुळका आला असा सवाल उपस्थित होत आहेत. 

व्हिडीओत काय म्हणाली राखी?

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये राखी सावंत ही पाकिस्तानचा जयघोष करताना दिसते. पाकिस्तान जिंदाबादच्या जयघोष करणारा तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळे तिला ट्रोल करू लागले आहेत. व्हिडीओत राखी म्हणाली, 'मी राखी सावंत आहे. मी खरं बोलेन. खऱ्याशिवाय काही बोलणार नाही. पाकिस्तानवाले मी तुमच्यासोबत आहे. जय पाकिस्तान!' राखीचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण तिच्यावर संतापले आहेत आणि ते तिला भारताबाहेर हाकलण्याची मागणी करत आहेत. तिचे नागरिकत्व रद्द करून तिच्यावर देशद्रोहाची कारवाई करण्यासाठी सांगत आहेत. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेमुळे राखी सावंत आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. राखी सावंतवर कारवाई करा अशी मागणी मनसेनं केली आहे. 

हेही वाचा : 'खूप पुजा केली आता...'; 16 गोळ्या अन्... जाणून घ्या का झाली गुलशन कुमार यांची हत्या?

राखी सावंतचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यावर सगळीकडून प्रतिक्रिया येत आहे. तर यावर मनसे कार्यकर्ता, अनिश खंडागळे यांनी एक व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. 'व्हायरल व्हिडीओमध्ये या बाई म्हणतायत की, पाकिस्तानवालों.. मैं तुम्हारे साथ हूँ. आता मी त्या देशाचं नाव पण घेऊ इच्छित नाही. भारत-पाकिस्तानदरम्यान इतका तणाव असताना या बाई आपल्या विरोधी देशाचं नाव घेत आहेत आणि त्याचा विजय असो असं म्हणतायत. मी राखी सावंतचा जाहीर निषेध करतो. राखीने भारतात राहून इथल्या प्रेक्षकांच्या जीवावर नाव कमावलं, पैसा कमावला. आता ती पाकिस्तानचा उदो-उदो करतेय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात म्हटलंय की मी प्रथमत: भारतीय आणि अंतिमत: सुद्धा भारतीय. मला राखी सावंतने उत्तर द्यावं की, तुम्ही प्रथमत: भारतीय आहात, मग अंतिमत: तुम्ही कोण आहात? मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना विनंती करतो की अशा व्यक्तीला भारतातून हाकललं पाहिजे, जेणेकरून अशी लोकं भारतात राहून, भारतामध्ये मोठं होऊन, पैसा कमवून पाकिस्तानचा उदो-उदो करणार नाहीत.'

Read More