Marathi News> भारत
Advertisement

Rakshabandhan ला भावाला चुना लावण्यासाठी जबरदस्त फंडा! बहिणीने लावली QR Code वाली मेहंदी, पाहा VIDEO

Mehandi Design Video : रक्षाबंधनाला भावाला चुना लावण्यासाठी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. QR Code वाली मेहंदीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तुम्ही पाहिली का हा व्हिडीओ?

Rakshabandhan ला भावाला चुना लावण्यासाठी जबरदस्त फंडा! बहिणीने लावली QR Code वाली मेहंदी, पाहा VIDEO

Sister make QR Code Mehndi on Rakshabandhan video : रक्षाबंधनाला बहिणी भावाच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या हाताच्या मनगटावर रक्षा सूत्र म्हणजे राखी बांधते. त्यानंतर ती भावाकडून भेटवस्तू घेते. त्यामुळे बहिणी रक्षाबंधनाची उत्सुकतेने वाट बघत असते. जर भाऊराया भेटवस्तू आणायला विसरला तरी बहिणी कशी काय तिचं मान सोडणार. ती हक्काने त्याच्याकडून पैसे तरी घेते. (rakshabandhan 2023 qr code mehendi viral video twitter and instagram trending now)

सध्याचं युग हे डिजिटलचं आहे. त्यामुळे अनेक आर्थिक व्यवहारापासून आजकाल गिफ्टदेखील ऑनलाइन दिले जातात. अशात एका बहिणीने भावाला रक्षाबंधनाला चुना लावण्यासाठी भन्नाट आणि हायटेक आयडिया शोधून काढली आहे. 

सण म्हटलं की स्त्रीयांना मेहंदी काढायला खूप आवडते. या बहिणीने तिच्या हातावर QR कोडची मेहंदी (QR Code Viral Rakhi) काढली आहे. सोशल मीडियावर या बहिणीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. बहिणीची ही मेंहदी पाहून भाऊरायादेखील चकरावतो. 

हेसुद्धा वाचा - Viral Video : प्रियकरला बहिणीसोबत पाहिलं म्हणून त्याला भरपावसात काढलं घराबाहेर, पण ही फसवणूक तिने पाहिली...

भावाला वाटलं बहीण गंमत करत असणार...बहीण आपल्या भावाला आव्हान देते की, ती मेहंदी स्कॅन झाली तर तुला 5,000 द्यावे लागतील. त्याला वाटलं मेहंदीमधील QR कोड स्कॅन नाही होणार म्हणून तो ती स्कॅन करतो आणि भाऊ आश्चर्यचकित होतो. तिला UPI द्वारे पैसे पाठवताना तो या व्हिडीओमध्ये दिसतोय. या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

ट्विटर युजर @Ravisutanjani याने रक्षाबंधनाच्या निमित्ताने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओला 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 


हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील yash_mehndi या अकाऊंटवरही पोस्ट करण्यात आला आहे. 

Read More