Ram Mandir Inauguration Date and Time : भारतातील एका ठिकाणाची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे. राजकीय पटल असो किंवा मग पर्यटन विश्व असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये गाजणारं हे ठिकाण आहे अयोध्या. प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली भूमी म्हणत अनेकांसाठीच श्रद्धास्थानी असणाऱ्या या अयोध्या नगरीचं वेगळं रुप आता सर्वांसाठी सज्ज झालं असून, लवकरच या नगरीत भाविकांची गर्दी होणार आहे. कारण, बहुप्रतिक्षित अयोध्या राम मंदिरात लवकरच प्राणप्रतिष्ठापनेसाठीचे विधी सुरु होणार आहेत.
16 जानेवारी 2024 पासून अयोध्येतील राम मंदिरात विधिवत पूजा सुरु होणार असून 22 जानेवारी 2022 मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. ज्यानंतर भक्तांसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीनं 'आरती पास' ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रभू श्रीरामांची तीन पद्धतींनी आरती होणार असून, भाविकांना त्यांच्या प्राधान्यानं आरतीसाठीचे पास निवडण्याची आणि बुकिंग करण्याची मुभा असेल. तत्पूर्वी तुमच्या मनातील राम मंदिरासंबंधीच्या प्रश्नाची उत्तरं पाहा आणि ही माहिती लक्षात ठेवा...
उत्तर प्रदेशातील राम जन्मभूमी, अयोध्या येथे राम मंदिर उभारण्यात आलं आहे.
24 जानेवारी 2024 रोजी राम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून पूजेसाठीचा वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.
#WATCH | Offline and online booking for obtaining 'aarti pass' begins at Ayodhya Ram temple
— ANI (@ANI) December 28, 2023
Dhruvesh Mishra, 'Aarti pass' section manager says, "Aarti is held at three times a day. Only pass-holders can attend it. The pass for the aarti can be obtained by producing… pic.twitter.com/LQqZbkp0IZ
अयोध्येपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामुळं इथं भाविक आणि पर्यटक सहजपणे पोहोचू शकतात.
येत्या काळात राम मंदिर आणि अयोध्येमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा आकडा पाहता सध्या उत्तर प्रदेश राज्य शासन आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाच्या वतीनं सर्व गोष्टींची काळजी घेतली जात असून, भविष्याच्या दृष्टीनंही महत्त्वाची आखणी केली जात आहे.