Marathi News> भारत
Advertisement

जामीनानंतर बलात्काराच्या आरोपीवर फुलांची उधळण

 बलात्काराच्या आरोपामध्ये जामीन मिळाल्यानंतर जालंदरचा बिशप फ्रन्को मलक्कल याचं चक्क फुलं उधळून स्वागत करण्यात आलं. 

जामीनानंतर बलात्काराच्या आरोपीवर फुलांची उधळण

जालंदर : पंजाब येथे बलात्काराच्या आरोपामध्ये जामीन मिळाल्यानंतर जालंदरचा बिशप फ्रन्को मलक्कल याचं चक्क फुलं उधळून स्वागत करण्यात आलं. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. महिलांनी याचा निषेध व्यक्त केलाय.

केरळमधल्या एका ननवर बलात्कार केल्याच्या आरोपात त्याला अटक झाली होती. सशर्त जामीन मिळाल्यानंतर तो पंजाबला परतला असला तरी त्याचं स्वागत एखाद्या विजेत्याप्रमाणे करण्यात आलं. 

यावर पीडित तरुणीच्या नातलगांनी तीव्र नापसंती व्यक्त केलीये. वारंवार बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला इतक्या लवकर जामीन मिळाल्याबाबतही मुलीच्या भावानं नापसंती दर्शवली आहे.

Read More