Marathi News> भारत
Advertisement

Afghanistan Crisis :मुलींना बेशुद्ध करून किंवा डेडबॉडीवरही करतात रेप; तालिबान्यांची हैवानीयत जगासमोर

तालिबान्यांचा क्रुर चेहरा सर्वांसमोर येत आहे. तालिबानी दहशतवाद्यांची क्रुरता भारतात पोहचलेल्या महिला मुस्कान यांनी सांगितली.

Afghanistan Crisis :मुलींना बेशुद्ध करून किंवा डेडबॉडीवरही करतात रेप; तालिबान्यांची हैवानीयत जगासमोर

नवी दिल्ली : तालिबान्यांचा क्रुर चेहरा सर्वांसमोर येत आहे. तालिबानी दहशतवाद्यांची क्रुरता भारतात पोहचलेल्या महिला मुस्कान यांनी सांगितली. त्यांनी म्हटले की तालिबानी दहशतवादी मुलींच्या मृतदेहावरही रेप करतात. त्यांच्याकडून माणूसकीची आशा करता येणार नाही. अफगानीस्तानात महिला संकटात आहेत.

न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत मुस्कानने म्हटले आहे की, तालिबानी डेडबॉडीवरही रेप करतात. त्यांना मुलगी जिवंत आहे की, मेलेली याचा काही फरक पडत नाही. या लोकांवर विश्वास ठेवता येणार नाही. तालिबानी एक तर मुलींच अपहरण करून घेऊन जात असत किंवा गोळी घालून ठार करीत असत. ही तर सुरूवात आहे. ते लोक बऱ्याच क्रुर गोष्टी करतात.

मु्स्कान यांनी पुढे म्हटले की, तालिबान्यांची इच्छा असते की त्यांनी प्रत्येक घरातून मुली मिळाव्या. ते 10 ते 12 वर्षाच्या मुलींना उचलून घेऊन जातात. ते मीडियासमोर खोटं बोलत आहे. की ते बदलले आहेत. तो एक दिखावा आहे फक्त. ते मुलींना औषधं देऊन बेशुद्ध करीत असत. तसेच ताबूतमध्ये ठेवून पाकिस्तानकडे घेऊन जात असत. 

याआधी तालिबानी दहशतवाद्यांनी आपल्या ताब्यात असलेल्या परिसरातील मौलवींना आदेश दिली होते की, 12 वर्षाहून अधिक मुलींची यादी त्यांना द्यावी. तालिबान्यांचे म्हणणे होते की, ते त्यांच्याशी लग्न करतील. परंतु सत्य हे आहे की, ते मुलींना गुलाम बनवू इच्छिता आणि त्यांना जेव्हा इच्छा होईल तेव्हा ते मुलींशी  संबध ठेवतील.

Read More