Marathi News> भारत
Advertisement

पॉर्न फिल्म दाखवून माजी आमदाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

  देशात महिलांविरोधात होणाऱ्या घटना थांबायचे काही नाव घेत नाहीत. पंजाबमध्ये असाच एक प्रकार घडला आहे ज्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आणि ही घटना माजी आमदाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाचा आरोप तिच्याच परिसरातील एका कपडा व्यापारी बाप - मुलावर लावला आहे. 

पॉर्न फिल्म दाखवून माजी आमदाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मुंबई :  देशात महिलांविरोधात होणाऱ्या घटना थांबायचे काही नाव घेत नाहीत. पंजाबमध्ये असाच एक प्रकार घडला आहे ज्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आणि ही घटना माजी आमदाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाचा आरोप तिच्याच परिसरातील एका कपडा व्यापारी बाप - मुलावर लावला आहे. 

पॉर्न क्लिप दाखवून केला बलात्कार 

या दोन्ही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. मात्र हे दोघेही पीडित मुलीली नशेच औषध पाजून तिला अश्लिल फिल्म दाखवून तिच्यासोबत रेप करायचे. माजी आमदार यांच्या निधनानंतर कुटुंबाची दयनीय अवस्था झाली. घरची आर्थिक परिस्थिती खराब झाल्यामुळे त्यांच्या मुली लोकांच्या घरी घरकाम करीत असत. आणि याचसाठी ही अल्पवयीन मुलगी आत्मा सिंह यांच्या घरी गेली होती. 

तीन महिन्यापासून करत होते बलात्कार 

पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवल्यानंतपर पीडित मुलीने सांगितलं की, वडिलांच्या निधनानंतर ती आपल्या आईसोबत राहत होती. आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे ती घरकाम करत होती. गेल्या तीन महिन्यांपासून पीडित मुलीवर रेप होत आहे. सतत बलात्कार करून तिला कायम धमकावल जात असे. 

Read More