Marathi News> भारत
Advertisement

एक रुपयाची 'ही' दुर्मिळ नोट तुम्हाला बनवेल लखपती, जाणून घ्या

1 रूपयाची नोट 7 लाख मिळवून देणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

एक रुपयाची 'ही' दुर्मिळ नोट तुम्हाला बनवेल लखपती, जाणून घ्या

मुंबई : तुम्हालाही जुनी नाणी आणि चलनी नोटा जमा करण्याचा शौक असेल, तर तुमचा हा छोटासा छंद तुम्हाला लखपती बनवू शकेल. कारण जुनी नाणी आणि नोटा कधीकधी लिलावात चांगली रक्कम मिळवू शकतात. असचं या एक रुपयाच्या दुर्मिळ नोटबाबत होत आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर ही नोट असेल तर तुम्ही लकी आहात. 

जर तुम्ही कोणत्याही सुरुवातीच्या गुंतवणुकीशिवाय घरी बसून पैसे कमवायचे असतील तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी असू शकते. जर तुमच्याकडे ही दुर्मिळ 1 रुपयाची नोट असेल तर तुम्ही फक्त घरी राहून 7 लाख रुपये कमवू शकता.

सात लाखासाठी 'ही' अट
भारत सरकारने 26 वर्षांपूर्वी या विशेष 1 रुपयाच्या नोटेचे उत्पादन आणि वापर बंद केला होता. या नोटेची छपाई सरकारने जानेवारी 2015 मध्ये पुन्हा सुरू केली, ती पुन्हा बाजारात आणली गेली.जर तुम्हाला या एक रुपयाच्या नोटेद्वारे 7 लाख रुपये मिळवायचे असतील, तर ही नोट देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी छापलेली असावी. या नोटेच्या सुरुवातीच्या नोटाची विक्री केल्यास तुम्हाला नक्कीच मोठी रक्कम मिळू शकते.

या 1 रुपयाच्या नोटेचे वैशिष्ट्य म्हणजे ही आता एकमेव स्वातंत्र्यपूर्व नोट आहे, ज्यावर तत्कालीन राज्यपाल जेडब्ल्यू केली यांची स्वाक्षरी आहे. त्यामुळे ऑनलाइन लिलावात त्याची विक्री केल्यास तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो.

ही नोट 80 वर्षांहून अधिक जुनी असून ब्रिटिशांनी 1935 मध्ये जारी केली होती. तसेच, 1966 च्या एक रुपयाच्या नोटेची किंमत 45 रुपये आहे तर 1 रुपयाच्या 1957 च्या नोटेची किंमत 57 रुपये आहे.

olx वर विक्री करा
तुम्हाला ही नोट ऑनलाइन विकायची असल्यास, तुम्ही OLX वर खाते तयार करून विकू शकता. तुम्ही प्रथम OLX वर विक्रेता म्हणून नोंदणी करावी आणि नंतर खाते तयार करावे. त्यानंतर, तुम्हाला नोटेच्या दोन्ही टोकाचे चित्र वेबसाइटवर अपलोड करावे लागेल. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि इतर माहिती वेबसाइटवर टाकावी लागेल, त्यानंतर ज्या व्यक्तीला नोट घ्यायची आहे तो तुमच्याशी संपर्क करेल.

Read More