Ravi Kishan Viral Video : सध्या संसदेचं अधिवेशन सुरुय आणि देशभरात अनेक प्रश्न प्रलंबीत असतांना भाजप खासदार मात्र समोश्याची साईज मोजण्यात गर्क आहेत. भाजप खासदार रवि किशन यांनी संसदेत हॉटेल आणि ढाब्यांतील अन्नाच्या प्रमाणाचे मानक निश्चित करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. मात्र हा प्रश्न मांडतांना त्यांनी दिलेलं समोशाच्या साईजचं उदाहरण सध्या चर्चेचा विषय ठरलंय.
संसदेतल्या खासदारांच्या या भाषणानं आणखी एक नवं घोषवाक्य जन्माला घातलंय, एक देश एक समोसा... खासदार रवी किशन यांच्या या वक्तव्यानं सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पाडलाय. खरं तर देशात वेगवेगळ्या ठिकाणी खाद्यपदार्थांसाठी वेगवेगळे दर आकारले जातात. जो सामोसा फेरीवाल्याकडे 20 रुपयात मिळतो त्याचे विमानतळावर 200 रुपये होतात. हॉटेलमधली एक वाटी डाळ कधी 150 ची तर कधी 250 ची असते. हा भेदभाव संपवण्यासाठी थेट मोदींनीच पुढाकार घ्यावा असा आग्रह खासदार महोदय करतायेत.
देशभर के होटल और ढाबों में मिलने वाले भोजन की मात्रा का मानक तय हो ।
— Ravi Kishan (@ravikishann) July 30, 2025
मेन्यू कार्ड में सिर्फ कीमत लिखी होती है, मात्रा नहीं, जिससे ग्राहकों को भ्रम होता है और भोजन का वेस्टेज भी होता है।
मेरी मांग है कि सरकार एक ऐसा कानून बनाए जिससे:मेन्यू में मूल्य के साथ-साथ खाद्य पदार्थ की… pic.twitter.com/ez91qJtxgM
खरं तर खासदार रवि किशन यांनी खाद्यपदार्थांच्या प्रमाणाबाबत निश्चित मानके असावीत हा मुद्रा उपस्थित केला. हॉटेल्सच्या मेनू कार्डवर फक्त किंमत नमूद असते, प्रमाण नमुद नसते. मेनूमध्ये किंमतीसोबत अन्नपदार्थाचे प्रमाण देखील नमूद करावे. तसंच अन्न कोणत्या तेलात किंवा तूपात शिजवले जाते याची माहिती देखील ग्राहकाला द्यावी, अशी मागणी केलीय. मात्र उदाहरणादाखल मांडलेला सामोश्याच्या साईजचा मुद्द्यानं मात्र संसदेतही चांगलाच हशा पिकवला.
गोरखपूरचे भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन यांना त्यांच्या समोशाच्या भाषणामुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. लोक त्यांच्यासोबत खूप मजा करत आहेत. एका वापरकर्त्याने कमेंट केली की, 'चटणीची गोष्ट सोडून दिली आहे.' दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले की, 'आता पार्ले जीच्या आकारावरही चर्चा झाली पाहिजे.' दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले की, 'पुढील अंक पनीरबद्दल असावा.' एका वापरकर्त्याने लिहिले की, 'साहेब, तुम्ही चुकीच्या व्यवसायात आला आहात, तुम्हाला एअर शॉपमध्ये असायला हवे होते.'