Marathi News> भारत
Advertisement

एक, दोन, पाच आणि दहा रुपयांसदर्भात आरबीआयची महत्त्वाची माहिती

ही नाणी स्वीकार न करण हा कायद्याने अपराध असणार आहे. 

एक, दोन, पाच आणि दहा रुपयांसदर्भात आरबीआयची महत्त्वाची माहिती

पटना : भारत सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या एक, दोन, पाच आण दहा रुपयांची नाणी वैध आणि चलनात असल्याचे भारतीय रिझर्व बॅंकेने सांगितले आहे. ही नाणी स्वीकार न करण हा कायद्याने अपराध असणार आहे. सर्वसामान्य जनतेला ही नाणी बॅंकेतील आपल्या खात्यात भरण्यासाठी कोणती मर्यादा नसेल असेही आरबीआयने स्पष्ट केलयं.  नाणी जमा करण्यासंदर्भातील कायद्याच्या काही तरतूदी या व्यापारी देवाणघेवाणीसाठी आहेत. नाण्यांच्या देवाणघेवाणीसाठी पटना येथील भारतीय रिझर्व बॅंकेचे कार्यालयातील काऊंटर असल्याचेही सांगण्यात आले आहे.  नाणी घेण्यास नकार देणाऱ्या काही तक्रारी समोर येत आहेत. 

व्यापारी-ग्राहकांमध्ये हाणामारी 

'आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात शिक्के जमा आहेत. ही नाणी बॅंकेत जमा होत नाहीत किंवा ग्राहकही घेत नाहीत', असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तर 'दुकानदार नाणी घेत नाहीत', अशी तक्रार ग्राहकांकडून होत आहे. नाणी घेण्यावरून अनेकदा व्यापारी आणि ग्राहकांमध्ये हाणामारी झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. 

Read More