Marathi News> भारत
Advertisement

RBI New Rules:आरबीआयने Personal Loan च्या नियमांमध्ये केले बदल; जाणून घ्या नवे नियम

 भारतीय रिझर्व बँकेने पर्सनल लोनच्या बाबतीत नियमांमध्ये बदल केला आहे. RBI ने डायरेक्टर्ससाठी पर्सनल लोनला मर्यादा घातली आहे. 

RBI New Rules:आरबीआयने Personal Loan च्या नियमांमध्ये केले बदल; जाणून घ्या नवे  नियम

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व बँकेने पर्सनल लोनच्या बाबतीत नियमांमध्ये बदल केला आहे. RBI ने डायरेक्टर्ससाठी पर्सनल लोनला मर्यादा घातली आहे. या नवीन नियमानुसार बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि त्यांच्या कुटूंबियांना कर्जाची मर्यादा 5 कोटी रुपये ठेवली आहे. याआधी कोणत्याही बँकेच्या डायरेक्टरसाठी पर्सनल लोनची लिमिट 25 लाख रुपये इतकी होती. 

RBI चे नियम
RBI कडून जारी करण्यात आलेल्या नियमांमध्ये RBIच्या तसेच अन्य बँकांच्या चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर्सच्या पती-पत्नी तसेच नातेवाईकांना 5 कोटींहून अधिक पर्सनल लोन देण्याची परवानगी नसणार आहे. 

याआधी काही बँकांच्या उच्च अधिकाऱ्यांनी आपल्या कर्ज देण्याच्या अधिकाराचा गैरवापर केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांच्यासह अनेक मोठ्या अधिकाऱ्यांवर पदाच्या दुरूपयोगाचे आरोप लागले होते.

Read More