Marathi News> भारत
Advertisement

Bank News : बँक कर्मचाऱ्यांची आठवडी सुट्टी रद्द; RBI चे निर्देश

RBI on Bank Holiday: आठवडी सुट्टीच्या दिवशी, म्हणजेच रविवारीही देशभरातील बँका सुरु, RBI चा मोठा निर्णय. पाहा सविस्तर वृत्त.   

Bank News : बँक कर्मचाऱ्यांची आठवडी सुट्टी रद्द; RBI चे निर्देश

RBI on Bank Holiday: देशभरातील लहानमोठ्या सर्वच बँका आणि पतसंस्थांसह आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांवर लक्ष ठेवून असणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेनं आता एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या या निर्णयानुसार आता देशात रविवारीसुद्धा बँका सुरुच राहणार आहेत. आरबीआयनंच असे निर्देश दिले असून, त्यामुळं आता बँक कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. 

RBI च्या निर्देशांनुसार 31 मार्च 2024 अर्थात रविवारी देशभरातील सर्व बँका सुरु राहणार आहेत. सुट्टीच्या दिवशीही बँका सुरु ठेवण्याचा निर्णय आरबीआयनं घेतला असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे. ज्यामुळं रविवारी बँकांच्या दारावर टाळं दिसणार नाहीये. 

सुट्टीच्या दिवशी बँका सुरु ठेवण्याचं कारण काय?  

चालू आर्थिक वर्ष अर्थात 2023-2024 या आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असल्यामुळं रिझर्व्ह बँकेनं देशातील बँका सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. Annual Closing असल्याचं कारण देत सर्व बँका सुरु राहतील. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवसापर्यंत होणारे सर्व व्यवहार त्याच वर्षात नोंदवण्यात येतील असं कारण आरबीआयनं दिलं आहे. त्यामुळं रविवारीही बँकांमधील सर्व व्यवहार सुरु ठेवण्याचे निर्देश आरबीआयनं दिले असून, सर्व सरकारी व्यवहारांचा हिशोब ठेवला जाणार आहे. 

हेसुद्धा वाचा : सणवार तोंडावर असतानाच 'आनंदाचा शिधा' बंद; का घेण्यात आला हा निर्णय? 

Read More