Marathi News> भारत
Advertisement

शिवसेना पक्षप्रवेशाबाबत खासदार तटकरेंची प्रतिक्रिया

 राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

शिवसेना पक्षप्रवेशाबाबत खासदार तटकरेंची प्रतिक्रिया

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय राष्‍ट्रवादी काँगेसचे जिल्‍हा सरचिटणीस रघुवीर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच नाशिकमधील दिंडोरी मतदार संघातील राष्ट्रवादीचे धनराज महाले शिवसेनेत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर तटकरेंचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जात आहे. या सर्व प्रकरणावर खासदार सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी झी २४ तासशी बोलताना स्पष्ट केले आहे. 

उद्धव ठाकरे यांच्याशी माझे बोलणे झाले नाही. तसेच शिवसेनेशी कसलीच चर्चाही झाली नसल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादीतील अनेकांना शिंग फुटले आहे. म्हणून इतर पक्षात जात असल्याचे सांगत त्यांनी बंडखोरी करणाऱ्यांवर प्रहार केला आहे.

Read More