Marathi News> भारत
Advertisement

आता या भारतीय अरबपतीने सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का

अरबपतींनी देश सोडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. आता आणखी एका भारतीय अरबपतीने आपला देश सोडल्याचा प्रकार घडला आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतातील अरबपती हा देश सोडून जात आहेत. फायनॅशिअल सर्व्हिसेस फर्म मॉर्गन स्टेनलीच्या रिपोर्टनुसार, 2014 ते आतापर्यंत 23 हजार भारतीय अरबपतींनी देश सोडला आहे. 

आता या भारतीय अरबपतीने सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का

मुंबई : अरबपतींनी देश सोडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. आता आणखी एका भारतीय अरबपतीने आपला देश सोडल्याचा प्रकार घडला आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतातील अरबपती हा देश सोडून जात आहेत. फायनॅशिअल सर्व्हिसेस फर्म मॉर्गन स्टेनलीच्या रिपोर्टनुसार, 2014 ते आतापर्यंत 23 हजार भारतीय अरबपतींनी देश सोडला आहे. 

या अरबपतीने भारत देश सोडून सायप्रस या देशाचं नागरिकत्व स्विकारलं आहे. भारताच नागरिकत्व सोडण्याचं कारण हे अतिशय धक्कादायक आहे. बहुदा पहिल्यांदाच अशा कारणामुले कुणी देश सोडला असेल 

हिरानंदानी ग्रुपचे को - फाऊंडर 

रिअल इस्टेट टायकून सुरेंद्र हिरानंदानी यांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. सुरेंद्र हिरानंदानी ग्रुपचे को फाऊंडर होते. सुरेंद्र हिरानंदानी यांची ओळख रिअल इस्टेटमधील दिग्गजांमध्ये होती. त्यांनी आपला भाऊ निरंजनसोबत देशातील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट कंपनी सुरू केली आहे. 63 वर्षाच्या या व्यवसायाने आता साइप्रसचे नागरिकत्व घेतलं आहे. सुरेंद्र हिरानंदानी हे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या बहिणीचा नवरा आहे. अक्षय कुमार यांची बहिण अल्का हिचं सुरेंद्रसोबत 2012 मध्ये लग्न झालं आहे. 

देश सोडण्याचं हे आहे खरं कारण 

सुरेंद्र हिरानंदानी यांनी भारत सोडण्याच जे कारण दिलं हे अतिशय धक्कादायक आहे. त्यांनी सांगितलं की, भारतीय पासपोर्टवर वर्क विझा मिळणं थोडं कठीण असतं. आणि हेच महत्वाचं कारण आहे ज्यासाठी हिरानंदानी यांनी भारत सोडलं आहे. टॅक्स रेट आणि इतर कोणत्याही गोष्टीचा त्रास नाही 

Read More