Marathi News> भारत
Advertisement

'भारत माता की जय' न म्हणणारे राष्ट्रद्रोही नव्हेत- शशी थरुर

त्यांचा धर्म 'भारतमाता की जय' म्हणण्याची अनुमती देत नाही.

'भारत माता की जय' न म्हणणारे राष्ट्रद्रोही नव्हेत- शशी थरुर

नवी दिल्ली: काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 'भारतमाता की जय' न म्हणणारे राष्ट्रद्रोही ठरत नाहीत, असे विधान त्यांनी केले. ते सोमवारी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) कार्यक्रमात बोलत होते.  मुस्लिम बांधव जय हिंद म्हणतात, जय भारत म्हणतात. त्यांचा धर्म भारतमाता की जय म्हणण्याची अनुमती देत नाही. म्हणून ते राष्ट्रविरोधी ठरत नाहीत, असे मत शशी थरुर यांनी मांडले. 

Read More