Marathi News> भारत
Advertisement

मुकेश अंबानींचा 22 जानेवारीसाठी मोठा निर्णय, देशभरातील रिलायन्सच्या...

Reliance Industries : अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योगसमूहाने त्यांच्या देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी 22 जानेवारीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. 

मुकेश अंबानींचा 22 जानेवारीसाठी मोठा निर्णय, देशभरातील रिलायन्सच्या...

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत 22 जानेवारीला नवीन मंदिरात रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणेचा तो ऐतिहासिक क्षण देशवासीय याची देही याची डोळा पाहण्यासाठी उत्सुक आहे. देशात सोमवार 22 जानेवारीचा दिवस दिवाळीसारखा असणार आहे. याचपार्श्वभूमीवर अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त सुट्टी जाहीर केली आहे.

यापूर्वी केंद्र सरकारने 22 जानेवारीला सर्व कार्यालये अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठतही या निमित्ताने अर्धा दिवस बंद असणार आहे. त्याच वेळी, आतापर्यंत सात राज्यांमध्ये अर्धा दिवस घोषित करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम आणि ओडिशा या राज्यांमध्ये सार्वजनिक सुटी आधीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही हाच निर्णय घेतला आहे. राममंदिर उद्घाटन कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

दरम्यान महाराष्ट्र सरकारने 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमन केली जाणाऱ्या अर्थविषयक मार्केटही या दिवशी बंद राहणार आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंट सिक्युरिटी, फॉरेन एक्स्चेंज, मनी मार्केट आदीमध्ये व्ववहार होणार नाहीत, असे आरबीआयने नमूद केले आहे. निफ्टी मार्केटही या दिवशी बंद राहणार आहे.

अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील रामभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. 22 जानेवारी रोजी देशभरात दिवाळीची सजावट करा आणि घरात दिव्यांचा सण साजरा करा. प्रत्येक घरात रामज्योत पेटवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.  

Read More