Marathi News> भारत
Advertisement

मुकेश अंबानींच्या कंपनीतील पहिले कर्मचारी कोण? त्यांच्या निधनाच्या वृत्तानं Reliance कुटुंबीयही हळहळले

Reliance jobs : मुकेश अंबानी यांच्या Reliance उद्योगसमुहामध्ये या व्यक्तीचं प्रचंड महत्त्वं; कोण होते मुकेश अंबानी यांच्या कंपनीतील पहिले कर्मचारी? निधनाच्या वृत्तानं अंबानी कुटुंबीयही हळहळले   

मुकेश अंबानींच्या कंपनीतील पहिले कर्मचारी कोण? त्यांच्या निधनाच्या वृत्तानं Reliance कुटुंबीयही हळहळले

Reliance jobs : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स उद्योग समुहानं विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावत एक नवी उंची गाठली. फक्त भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर या उद्योग समुहानं कमालीचं नावलौकिक मिळवलं. अशा या समुहाच्या यशात मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तीनं नुकताच जगाचा निरोप घेतला. रिलायन्स ब्रँन्ड्सच्या पहिल्या कर्मचाऱ्यांपैकी एक अशी त्यांही ओळख. या व्यक्तीचं नाव दर्शन मेहता. 

बुधवारी, 9 एप्रिल 2025 रोजी मेहता यांनी अखेरचा श्वास घेतला. 2007 मध्ये मुकेश अंबानी यांनी सुरू केलेल्या रिलायन्स ब्रँन्ड्सच्या सुरुवातीच्याच कर्मचाऱ्यांपैकी तेसुद्धा एक होते. जवळपास 17 वर्षे कंपनीत एमडीपदी काम केल्यानंतर त्यांच्यावर 2024 मध्ये कंपनीच्या नियामक मंडळात नॉन एग्झिक्यूटिव डायरेक्टर या पदाची जबबादारी सोपवण्यात आली होती. 

रिलायन्स समुहात काम करण्यापूर्वी ते अरविंद ब्रँड्स लिमिटेडमध्ये संचालकपदी काम पाहत होते. सीए अर्थात चार्टड अकाऊंटंट असणाऱ्या मेहता यांनी जाहिरात क्षेत्रापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती, त्यांना ईशा अंबानीच्या हाती जबाबदारी असणाऱ्या रिलायन्स ब्रँन्ड्समध्ये महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आणि त्यांच्या कामाचा आवाका पाहता ईशा अंबानीचे 'राईट हँड' अशीच त्यांची ओळख झाली. मेहता यांच्या पगारासंदर्भातील अधिकृत आकडेवारी समोर आली नसली तरीही काही Media Reports नुसार 2020-2021 दरम्यान त्यांना वर्षभरात 4.89 कोटी रुपये इतकं मानधन कंपनीकडून दिलं जात होतं असं म्हटलं गेलं. 

हेसुद्धा वाचा : ट्रम्पना जशास तसं उत्तर देणाऱ्या चीनला मिळेल का भारताची साथ? 125% Tariff चा डाव अमेरिकेवरच पलटणार? 

fallbacks

रिलायन्स ब्रँन्ड्स ही मुकेश अंबानी यांची तिच कंपनी जी सध्याच्या घडीला देशभरात 700 स्टोअर्स चालवत असून, या कंपनीत 10 हजारांहून अधिक कर्मचारी नोकरीवर रुजू आहेत. 85 हून अधिक आंतरराष्ट्री ब्रँडचे प्रोडक्ट या स्टोअरमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले असून, यामध्ये बरबेरी, वॅलेंटिनो, वर्साचे, बोट्टेगा वेनेटा, बालेनियागा, मार्क्स अँड स्पेंसर, टिफनी एंड कंपनी, जिमी चू, प्रेट ए मँगर आणि पॉटरी बार्न अशा ब्रँड्सचा समावेस आहे. भारतात याच कंपनीच्या माध्यमातून एर्मेनेगिल्डो जेग्ना, ब्रूक्स ब्रदर्स, टॉमी हिलफिगर, नॉटिका असे ब्रँड आणण्यासाठी मेहता यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं मानलं जातं. 

Read More