Marathi News> भारत
Advertisement

ED च्या धाडीच्या वृत्तांवर Reliance Power चं स्टेटमेंट; म्हणाले 'कंपनीच्या कामकाजावर परिमाण नाही, बोर्डात नाहीत अनिल अंबानी'

रिलायन्स पॉवरने नुकत्याच आलेल्या मीडिया रिपोर्ट्सवर स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीने सक्तवसुली संचलनालयाच्या कारवाईचा त्यांच्या व्यवसायावर, भागधारकांवर किंवा कर्मचाऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण तिचा आरकॉम आणि आरएचएफएलशी कोणताही व्यावसायिक किंवा आर्थिक संबंध नाही असं सांगितलं आहे.  

ED च्या धाडीच्या वृत्तांवर Reliance Power चं स्टेटमेंट; म्हणाले 'कंपनीच्या कामकाजावर परिमाण नाही, बोर्डात नाहीत अनिल अंबानी'

सक्तवसुली संचलनालयाकडून कारवाई करण्यात आल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांकडून देण्यात आल्यानंतर रिलायन्स पॉवर लिमिटेडने (Reliance Power) स्पष्टीकरण जारी केलं आहे. कंपनीने आपल्या भागधारकांना, कर्मचाऱ्यांना आणि इतर सर्व हितचिंतकांना आश्वासन दिलं आहे की, या कारवाईचा कंपनीच्या व्यवसायिक कामकाजावर, आर्थिक कामगिरीवर किंवा इतर कोणत्याही गोष्टींवर कोणताही प्रभाव पडणार नाही असं सांगितलं आहे. 

रिलायन्स पॉवरने शेअर बाजारांना दिलेल्या अधिकृत पत्रकात म्हटलं आहे की, कंपनी तिच्या व्यवसाय योजनांवर लक्ष केंद्रित करत आहे आणि सर्व भागधारकांसाठी मूल्य निर्माण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

रिलायन्स पॉवरने आपल्या स्पष्टीकरणात काय सांगितलं आहे?

कंपनीने अनेक मुद्द्यांच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे, जेणेकरुन कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये. 

RCOM/RHFL शी कोणताही संबंध नाही

कंपनीने स्पष्ट केलं आहे की मीडिया रिपोर्ट्समध्ये नमूद केलेले आरोप रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (RCOM) किंवा रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL) च्या 10  वर्षांपूर्वीच्या व्यवहारांशी संबंधित असल्याचं दिसत आहे. रिलायन्स पॉवरने अधोरेखित करत सांगितलं आहे की, ही एक "वेगळी आणि स्वतंत्र सूचीबद्ध कंपनी" आहे ज्याचा आरकॉम किंवा आरएचएफएलशी कोणताही व्यावसायिक किंवा आर्थिक संबंध नाही.

अनिल अंबानी बोर्डात नाहीत

निवेदनात अनिल अंबानी हे रिलायन्स पॉवरच्या संचालक मंडळावर नाहीत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे, आरकॉम किंवा आरएचएफएलविरुद्ध केलेल्या कोणत्याही कारवाईचा रिलायन्स पॉवरच्या प्रशासनावर (Governance), व्यवस्थापनावर (Management) किंवा कामकाजावर (Operations) कोणताही परिणाम होत नाही.

RCOM आणि RHFL ची सध्याची स्थिती

कंपनीने असंही सांगितलं की, RCOM गेल्या 6 वर्षांपासून इन्सॉल्वेंसी एंड बैंकरप्सी कोड (IBC), 2016 अंतर्गत कॉर्पोरेट इन्सॉल्वेंसी रिजॉल्यूशन प्रक्रियेतून जात आहे. तर, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरएचएफएलचा खटला पूर्णपणे निकाली काढण्यात आला आहे.

व्यावसायिक भरभराटीवर संपूर्ण लक्ष

हे निवेदन त्या गुंतवणूकदार आणि भागधारकांसाठी एक महत्त्वाचं आश्वासन आहे जे अलीकडील मीडिया रिपोर्ट्समुळे चिंतेत असतील. कंपनीने आपलं कामकाज सामान्यपणे सुरु असून, विकासाच्या मार्गावर वाटचाल सुरु राहील असंही स्पष्ट केलं आहे. 

Read More