Marathi News> भारत
Advertisement

रेपो रेटच्या कपातीनंतर व्याज दरात घट, पहिले होम लोन फेडायचं की गुंतवणूक करायची? तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर वाचाच!

Home Loan EMI: होम लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. रेपो रेटमध्ये कपात झाली आहे

रेपो रेटच्या कपातीनंतर व्याज दरात घट, पहिले होम लोन फेडायचं की गुंतवणूक करायची? तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर वाचाच!

Home Loan EMI: गृह कर्ज घेणाऱ्या नागरिकांना गेल्या कित्येक वर्षांपासून व्याज दरात घट होण्याच्या मागणीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने या वर्षी रेपो रेटमध्ये एकूण 100 बेसिस पॉइंट (1%)ची कपात केली आहे. याचा थेट परिणाम व्याज दरांवर पाहायला मिळतोय त्यामुळं होम लोन घेतलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही कपात पूर्णपणे लागू झाल्यानंतर होम लोन घेणाऱ्या ग्राहकांचा महिन्याचा ईएमआय कमी होऊ शकतो किंवा कर्जाचे वर्ष कमी होऊ शकतात. पण या निर्णयाबरोबरच एक प्रश्नदेखील चर्चिला जात आहे. ग्राहकांनी होम लोनचा एक हफ्ता किंवा ठराविक रक्कम आधीच भरायला हवी की हे अतिरिक्त पैसे शेअर बाजारात गुंतवणुक करायला हवेत. याचेच उत्तर जाणून घेऊयात.

रेपो रेट कमी झाल्यानंतर व्याज दर कमी होतो याचा थेट परिणाम तुमच्या ईएमआयवर होतो किंवा कर्जाचे वर्ष कमी होतात. उदाहरणार्थ, तुम्ही जानेवारी 2025मध्ये 50 लाखांचे लोन 8.5 टक्के व्याजदराने घेतले असेल तर 100 बेसिस पॉइंट्सच्या कपातीने कर्जाचा अवधी 206 महिने होईल. यामुळं तुम्ही जवळपास 14.78 लाख रुपयांची रक्कम वाचवू शकता. या बाबतीत तज्ज्ञांच्या मते, तुम्ही व्याज वाचवून लोन लवकर संपवण्याचा प्रयत्न करत आहात तर EMI तोच ठेवा. मात्र जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर गुंतवणुक करायची असेल तर EMI कमी करूू शकता.

होम लोन वेळेच्या आधीच पेमेंट केल्यास व्याज वाचू शकते. मात्र तुम्हाला इतर आर्थिक गोष्टींचीदेखील काळजी घ्यावी लागणार आहे. हा निर्णय तुमच्या जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीच्या परताव्यावर अवलंबून असतो. एका आकडेवारीनुसार, जर तुम्ही दरवर्षी थकीत कर्जाच्या 5% रक्कम आगाऊ भरली तर व्याजाचा भार 48% पर्यंत कमी होऊ शकतो. परंतु जर तुम्ही तीच रक्कम गुंतवली तर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो जो व्याज बचतीपेक्षा जास्त असू शकतो. शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने दीर्घकाळात सरासरी 10-12% परतावा मिळू शकतो, जो गृहकर्जाच्या व्याजदरापेक्षा जास्त आहे. परंतु हा परतावा निश्चित नाही. शेअर बाजारात चढ-उतारांमुळे अल्पावधीत नुकसान होऊ शकते.

आकडेवारीनुसार, इक्विटी म्युच्युअल फंड गृहकर्जाच्या व्याजदरांपेक्षा चांगले काम करतात. या संदर्भात, गुंतवणूक तुमच्यासाठी अधिक फायदेशीर असू शकते. परंतु, हा निर्णय तुमच्या आर्थिक निवडीवर अवलंबून असतो. जर तुमचे लक्ष्य कर्ज लवकर फेडण्याचे असेल, तर ते आधी भरणे चांगले. जर तुमचे इतर आर्थिक लक्ष्य असतील, जसे की मुलांच्या शिक्षणासाठी किंवा निवृत्तीसाठी बचत करणे, तर कमी जोखीम असलेले कर्ज निधी किंवा इतर गुंतवणूक पर्याय चांगले असू शकतात.

या निर्णयात तुमचे वय देखील महत्त्वाची भूमिका बजावते. जर तुम्ही तरुण असाल आणि गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे अनेक वर्षे असतील, तर शेअर बाजारात गुंतवणूक करणे चांगला पर्याय असू शकतो. परंतु जर तुम्ही निवृत्तीच्या जवळ असाल आणि तुमचे कर्ज अजूनही मोठे असेल, तर प्रथम कर्ज फेडणे चांगले राहील, विशेषतः जर बाजार चढ-उतारांच्या काळातून जात असेल. शेवटी, हा निर्णय पूर्णपणे तुमच्या आर्थिक परिस्थितीवर, जोखीम घेण्याची क्षमता आणि इतर लक्ष्यांवर अवलंबून असतो.

Read More