Marathi News> भारत
Advertisement

2,43,93,60,00,000 एवढ्या किंमतीच्या राजमहलात राहते भारतातील सर्वात सुंदर महिला

गुजरातमध्ये अँटीलिया पेक्षा भव्य दिव्य राजमहल आहे. इथं भारतातील सर्वात सुंदर महिला राहिते. 

2,43,93,60,00,000 एवढ्या किंमतीच्या राजमहलात राहते भारतातील सर्वात सुंदर महिला

Residence Laxmi Vilas Palace: 15 हजार कोटी रुपये..  भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटीलिया या निवासस्थानाची ही किंमत आहे. अँटीलिया हे जगभरातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. मात्र, भारतातील  सर्वात सुंदर महिला अँटीलिया पेक्षा भव्य दिव्य अशा राजमहलात राहते आहे. लक्ष्मी विलास पॅलेस असे या राजमहलाचे नाव आहे.  गुजरातमधील लक्ष्मी विलास पॅलेस हा ब्रिटनच्या प्रसिद्ध बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा आहे. जाणून घेऊया लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये राहणारी भारतातील सर्वात सुंदर महिला कोण?

लक्ष्मी विलास पॅलेस हे बडोदाचे राज घराने गायकवाड कुटुंबाचे निवासस्थान आहे. हा राजवाडा गायकवाड राजघराण्याचा महाल आहे. वडोदरामधील लक्ष्मी विलास पॅलेस हे जगातील सर्वात मोठे खाजगी निवासस्थान असून यासमोर अनेक श्रीमतांची घर फिकी पडतात. गायकवाड कुटुंबीय हे या पॅलेसचे मालक आहे. राजघराण्याचे प्रमुख समरजितसिंह गायकवाड हे त्यांच्या पत्नी राधिकाराजे गायकवाड आणि कुटुंबासह या वाड्यात राहतात. 2013 पासून ते कुटुंबासह या महालात आलिशान जीवनशैली जगत आहेत. 

महाराजा सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांनी सन 1890 मध्ये लक्ष्मी विलास पॅलेस बांधला होता. सध्या महाराज समरजीत सिंह गायकवाड आणि त्यांची पत्नी महारानी राधिका राजे गायकवाड यांचे कुटुंब या पॅलेसमध्ये राहत आहे. मराठा साम्राज्याच्या वैभव कसे होते याची झलक या राजवाड्यात पहायाल मिळते.  एकेकाळी गायकवाड कुटुंबाने बडोदावर राज्य केले होते. या पॅलेसची मालकी समरजीत सिंह गायकवाड यांच्याकडे आहे. समरजीत सिंह यांच्या कुटुंबियांची संपत्ती 20 हजार कोटींच्या आसपास आहे. 2002 साली त्यांचा विवाह राजकुमारी राधिकाराजे यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुली आहेत.

 3,04,92,000 स्क्वेअर फूटमध्ये लक्ष्मी विलास पॅलेस विस्तारलेला आहे. जगातील सर्वात महागडे घर असलेल्या ब्रिटनच्या बकिंगहॅम पॅलेसही याच्यापेक्षा आकारेने लहान आहे.  बकिंगहॅम पॅलेसचा विस्तार हा केवळ 8,28,821 स्क्वेअर फूट इतका आहे. तर जगातील सर्वात महागड्या घरांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या मुकेश अंबानी यांचे अँटिलिया हे आलिशान घर आहे. मात्र, अँटेलिया हाऊस देखील फक्त 48,780 स्क्वेअर फूट आकाराचे आहे. लक्ष्मी विलास पॅलेस मध्ये 170 हून अधिक खोल्या आहेत. याची किंमत  2,43,93,60,00,000  म्हणजेच जवळपास 25 हजार कोटी इतकी आहे.

 

Read More