Hr Professional Viral Linkedin Post Sparks Debat : पहिला जॉब, पहिला पगार हा अनुभव सर्वांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा अनुभव असतो. एक फ्रेशर कर्मचाऱ्याचा हा अनुभव चर्चेेचा विषय बनला आहे. याला कारणच तसं आहे. सकाळी 10 वाजता पगार झाला आणि पुढच्या 5 मिनिटांत म्हणजेच 10.05 मिनिटांनी राजीनामा दिला. कंपनीच्या HR ने एक स्क्रीनशॉट सोशल मिडियावर शेअर केला आहे. या पोस्टमुळे सोशल मिडियात मोठा वाद निर्माण झाला आहे.
चेन्नईस्थित एचआर प्रोफेशनल प्रियवर्षिनी एम यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टनंतर सोशल मीडियावर 'प्रोफेशनल एथिक्स' बद्दल वाद सुरू झाला आहे. चार दिवसांपूर्वी त्यांनी ही पोस्ट लिहिली होती, त्यासोबत एक फोटोही पोस्ट केला होता. सकाळी 10 वाजता पगार जमा झाला आणि सकाळी 10:05 वाजता राजीनामा ईमेल आला. या राजीनाम्याचा स्क्रीनशॉटच प्रियवर्षिनी यांनी शेअर केला आहे. याला प्रोफेशनल एथिक्स म्हणायचं का? असा प्रश्न प्रियवर्षिनी यांनी उपस्थित केला. काही लोकांनी एचआरच्या समर्थनार्थ लिहिले असताना, अनेकांनी कर्मचाऱ्याची बाजू घेतली.
एका कर्मचाऱ्याने त्याचा पहिला पगार मिळाल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांत राजीनामा दिला. टीमने त्याला प्रशिक्षण आणि ऑनबोर्डिंगमध्ये आठवडे घालवले. 'प्रोफेशनल एथिक्स' म्हणायचे का? हे अपरिपक्वता आणि बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. इतरांच्या वेळेची आणि प्रयत्नांची कदर करणे नाही अशा प्रकारची पोस्ट प्रियवर्षिनी यांनी लिहीली आहे. जर कामात काही अडचण असेल तर तुम्ही उघडपणे सांगा, मदत मागा आणि काळजीपूर्वक विचार करून राजीनामा द्या, सोयीनुसार नाही. कोणतेही काम सोपे नसते... प्रत्येक भूमिकेसाठी संयम, कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक असते. आणि हो, खरा विकास केवळ पगाराने होत नाही, तर सततच्या कठोर परिश्रमाने होतो. म्हणून कंपनी संस्कृती किंवा भूमिकेतील विसंगतीला दोष देण्यापूर्वी, थांबा आणि विचार करा, समजून घ्या आणि बोला... कारण शेवटी तुमची व्यावसायिक ओळख तुमच्या कामाने बनते, पदाने नाही अेसही प्रियवर्षिनी यांनी पोस्टममध्ये म्हंटले आहे.
प्रियवर्षिनी यांच्या पोस्टवर अनेक प्रकारच्या कमेंट आल्या आहेत. अनेकांनी राजीनामा देणाऱ्याला बेजबाबदार म्हंटले आहे. तर, अनेकांनी त्याचे कैतुक केले आहे. जेव्हा कंपन्या कोणतीही नोटीस न देता कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकतात तेव्हा कुठे असतात 'प्रोफेशनल एथिक्स' असा सवाल एका नेटकऱ्याने उपस्थित केला आहे.
जर कंपनीला कायमस्वरुपी नोकरी करणारा निष्ठावान कर्मचारी पाहिजे असले तर ऑफर लेटरऐवजी विवाह प्रमाणपत्र द्यावे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले - जेव्हा कर्मचारी कंपनी सोडतो तेव्हा कंपनीवर कोणताही परिणाम होत नाही, परंतु जेव्हा कंपनी अचानक कर्मचाऱ्याला काढून टाकते तेव्हा अनेक वेळा संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येते. हा फरक समजून घ्या.