Marathi News> भारत
Advertisement

'नमस्ते सर, मी विकला गेलोय' कर्मचाऱ्याचे Resignation लेटर वाचून बॉसने लावला डोक्याला हात!

सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. ज्यातून यूजर्सच मनोरंजन होत असतं. अनेक लोक यावर पसंती दर्शवतात आणि लाईक, शेअर, कमेंट करतात. सध्या एक मजेदार राजीनाम्याचा ईमेल सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय. जो वाचून लोक हसून हसून लोटपोट होतायत. या ईमेलमध्ये त्या व्यक्तीने इतक्या प्रामाणिकपणे आणि मोकळेपणाने आपली गोष्ट लिहिली आहे. जी वाचून कोणीही आपले हसू आवरू शकत नाही. 

'नमस्ते सर, मी विकला गेलोय' कर्मचाऱ्याचे Resignation लेटर वाचून बॉसने लावला डोक्याला हात!

Resignation Email: सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. ज्यातून यूजर्सच मनोरंजन होत असतं. अनेक लोक यावर पसंती दर्शवतात आणि लाईक, शेअर, कमेंट करतात. सध्या एक मजेदार राजीनाम्याचा ईमेल सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय. जो वाचून लोक हसून हसून लोटपोट होतायत. या ईमेलमध्ये त्या व्यक्तीने इतक्या प्रामाणिकपणे आणि मोकळेपणाने आपली गोष्ट लिहिली आहे. जी वाचून कोणीही आपले हसू आवरू शकत नाही. 

मुंबईस्थित हिंग्लिश या ब्रँडचे संस्थापक आणि सीईओ शुभम गुणे यांनी लिंक्डइनवर मजेदार राजीनामा पत्र शेअर केले. काही अवधीतच ते झपाट्याने व्हायरल झाले."ईमानदार इस्तीफा" या कॅप्शनसह शेअर केलेल्या या पोस्टमध्ये एका अत्यंत प्रामाणिक ईमेलचा स्क्रीनशॉट आहे. ज्याने सोशल मीडिया यूजर्सना हसवून त्यांचे खूप मनोरंजन केले आहे. 

काय लिहिलंय ईमेलमध्ये?

या ईमेलमध्ये असे लिहिलंय, 'नमस्ते सर, मी विकला गेलोय. समोरची कंपनी मला चार पैसे जास्त देतेय.' कमेंट सेक्शनमध्ये या ईमेलला भरघोस प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी याला प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनातील भावनांचा आवाज म्हटलंय. जो ते विचारतात पण कधी उच्चारत नाहीत. एका युजरने मजेशीरपणे म्हटले, "तुमच्या ईमेलमधील स्पष्टतेचा हा खरा अर्थ आहे. आम्ही नेहमीच याला चुकीच्या पद्धतीने समजत आलो आहोत." दुसऱ्या एका युजरने लिहिले, "हा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या अंतरात्म्याचा आवाज आहे." आणखी एका युजरने म्हटले, "जेव्हा तुम्हाला खरी गोष्ट कळते, तेव्हा फक्त निघून जा."ही मजेदार पोस्ट आणि त्यावरील प्रतिक्रिया यामुळे सोशल मीडियावर या राजीनामा पत्राची जोरदार चर्चा होतेय. 

अनेकांनी या ईमेलच्या साधेपणाला आणि प्रामाणिकपणाला दाद दिली आहे, तर काहींनी याला एक उत्तम मीम टेम्पलेट बनवले आहे. या ईमेलने कर्मचाऱ्यांच्या मनातील खऱ्या भावना हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडल्या असून, इंटरनेटवर क्रिएटिव्हिटी आणि विनोद याची कमतरता नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केलंय.

Read More