Marathi News> भारत
Advertisement

विष देऊन निवृत्त सैनिकाची केली हत्या

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये एका निवृत्त सैनिकाला विष देऊन मारण्यात आलं. 

विष देऊन निवृत्त सैनिकाची केली हत्या

मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये एका निवृत्त सैनिकाला विष देऊन मारण्यात आलं. 

सिविल लाइन्स या परिसरात एका निवृत्त सैनिकाची त्याच्याच कुटुंबातील एका महिलेने विष देऊन त्याची हत्या केली आहे. या महिलेने निवृत्त सैनिकावर लैंगिक अत्याचाराचा आरोप देखील लावला होता. सब इंस्पेक्टर कपिल कुमार यांनी सांगितले की, जवान सुभाष मेरठमधून हरवले होते. यानंतर त्यांच्या हरवण्याची तक्रार नोंदवण्यात आली. कुमार यांनी सांगितले की, चौकशी दरम्यान असं समजलं की सात डिसेंबरला ते आपली मेहुणी सुनीताकडे गेले होते. 

कडक कारवाई केल्यावर कळलं की, सुनीताने विष देऊन जवानाला मारलं आणि पुढे तिने सांगितले की, त्या सैनिकाचा मृतदेह तिने फेकून दिला. यब इंस्पेक्टरच्या सांगण्यानुसार महिलेने दावा केला आहे की, सुभाषने तिचे शोषण केले होते. त्यामुळे तिने हे कृत्य केलं. त्याचं शव अद्याप सापडलेले नाही. महिलेला अटक करण्यात आली आहे. 

Read More