Viral Jugaad Video: आपण सर्वच जण आपल्या कुठल्या कामात काहीतरी शॉर्टकट शोधायचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी (Viral Desi Jugaad Video) आपण हवे ते जुगाड करत असतो. अशा कल्पना या फक्त आपल्यालाच सुचू शकतात. सध्या असाच एक आगाळावेगळा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या व्यक्तीच्या जुगाडाकडे पाहून त्याच्या बुद्धीचे कौतुक कराल. तुम्हाला माहितीये का एका रिक्षावाल्यानं चक्क रिक्षापासून व्हॅगन कार तयार केली आहे. त्यामुळे सध्या या व्हिडीओची (Rickshwala Makes Wagon From Auto) सगळीकडेच तुफान चर्चा आहे.
तुम्हालाही हा जुगाड नक्की आवडेल कारण इतकी मेहनतचं या व्यक्तीनं घेतली आहे. अशा हुशार लोकांनी जरा जरी चांगल्या कामांमध्ये हात घातला तर देश कुठच्या कुठे जाईल अशा प्रतिक्रिया नेटकरी देताना दिसत आहेत. एका रिक्षा चालकानं चक्क रस्त्यावर धावून दाखवली आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. (rickshawala desi jugaad video makes wagon car from rickshaw netizens reacts with funny comments)
मध्यंतरी शेतात ट्रॅक्टरचाही (Trackter Jugaad) जुगाड करण्यातआला होता. तेव्हा असे अनेक व्हिडीओज हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. त्यामुळे नेटकऱ्यांना एक नवी माहिती मिळतेच परंतु त्याचसोबत त्यांचे तूफान मनोरंजनही होते. त्यामुळे असे व्हिडीओ हे इंटरनेटवर जोरात व्हायरल होतात. काही लोकं असे व्हिडीओ पाहून हैराणही होऊन जातात तर काही लोकांना आश्चर्याचा धक्काही बसतो. परंतु सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओनं तर इंटरनेटवर हशा पिकवला आहे.
या रिक्षावाल्यानं रिक्षाच्यावर या गाडीचे काही भाग लावले आणि रिक्षाच्या मागील बाजूला व्हॅगन गाडीचा भाग जोडला. तेव्हा मागून जाणाऱ्या कोणालाही असं वाटले की ही व्हॅगन गाडी आहे परंतु ही ती गाडी नाही. तर ही रिक्षा आहे. अशाच एका साक्षीदारानं या जुगाड असलेल्या गाडीचा मागून व्हिडीओ शूट केला आहे आणि सोशल मीडियावर तो व्हायरल झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, ही चेरी रंगाची जुनी व्हॅगननार कार आहे. हा VXI मॉडेलचा भाग आहे. त्यावर हरियाणाची नंबर प्लेट दिसते आहे. @ragiing_bull या युझरनं हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ जूना आहे. आता तो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
#DesiJugaad.
— दीपक प्रभु/DeepakPrabhu (@ragiing_bull) August 25, 2022
We have brains which will fail a qualified automobile engineer.
Necessity is the mother of invention.#atmanirbharbharat pic.twitter.com/HJt2RhO8PE
असे जुगाडाचे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा ट्रेण्ड होताना दिसतात त्यामुळे लोकं यांना पुन्हा पुन्हा व्हायरल करताना दिसतात. या व्हिडीओनंही नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.