Rippling Co-Founder Prasanna Shankar : रिप्लिंगचे सह-संस्थापक प्रसन्ना शंकरने आपल्या पत्नीवर विश्वासघाताचे गंभीर आरोप केले आहेत. यावर आता पत्नीने प्रत्युत्तर पहिल्यांदाच समोर आली आहे. पत्नी दिव्या सशिधने न्यायालयात असा दावा केला आहे की, प्रसन्ना लग्नानंतरही वेगवेगळ्या महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवायचा आणि एवढंच नव्हे तर पत्नीला जबरदस्ती 'ओपन मॅरेज' करण्यासाठी जबरदस्ती केली.
'सेन फ्रान्सिस्को स्टँडर्ड' च्या रिपोर्टनुसार, दिव्याने दावा केला आहे की, तिच्या नवऱ्याने तिच्यासोबत जबरदस्ती केली. वेश्यांसोबत संबंध ठेवले, तिच्यावर पारख ठेवली आणि दररोजच्या गोष्टींचे रेकॉर्ड ठेवले. एवढंच नव्हे तर बाथरुममध्येही ते तिच्या सतत मागे असायचे. दिव्याने असा देखील आरोप केला आहे की, प्रसन्ना तिला आणि मुलाला वेगवेगळ्या देशांमध्ये घेऊन जात असे जेणे करुन मोठ्या रक्कमेवर टॅक्स भरायला लागू नये.
दिव्याने असाही आरोप केला आहे की, प्रसन्ना यांनी डिलिवरी नंतरही सेक्स केलं. जेव्हा ती शारीरिक वेदनांमधून जात होती. तिने सांगितलं की,'प्रसन्ना असे म्हणायचे की, सेक्स ही त्याची बेसिक गरज आहे. मी किती त्रासात असली तरीही मला ते करावंच लागेल. नाहीतर तो बाहेर कुठे तरी जाईल.'
या अगोदर प्रसन्नाने दावा केला आहे की, त्यांच्या लग्नाला 10 वर्षे झाली आहे. त्यांना नऊ वर्षांचा मुलगा आहे. प्रसन्नाने आरोप केले आहेत की, पत्नीचे इतर व्यक्तीसोबत संबंध आहे. एढंच नव्हे तर त्यांनी पत्नीचे परपुरुषासोबतचे मेसेज आणि हॉटेल बुकिंगचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. प्रसन्ना यांनी त्या व्यक्तीचं नाव 'अनूप' असल्याचं म्हटलं होतं.
एका वृत्तानुसार, डिसेंबर 2019 च्या ईमेलमध्ये, प्रसन्ना यांनी दिव्याला लिहिले की त्याने अनेक एस्कॉर्ट्सशी संपर्क साधला आहे आणि त्यांचे फोटो आणि दर मिळवले आहेत. नंतर त्याला याचा पश्चात्ताप झाला. ते म्हणाले की, 'याचा आमच्या नात्यावर झालेल्या परिणामाबद्दल मला खूप वाईट वाटते. मी वचन देतो की मी हे पुन्हा करणार नाही.
त्याच दिवशी पाठवलेल्या दुसऱ्या ईमेलमध्ये त्यांनी दिव्यासोबतच्या ओपन मॅरेजबद्दलही लिहिलं होते. 'सॅन फ्रान्सिस्को स्टँडर्ड' कडून मी प्रसन्ना यांना याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी ईमेलला उत्तर देताना लिहिले, 'त्यावेळी त्यांचे लग्न 'सेक्सलेस' झाले होते आणि त्यांना हे का घडत आहे हे समजून घ्यायचे होते.' अहवालात असा दावा करण्यात आला आहे की प्रसन्नाने कबूल केले की त्याने Open Marriage बद्दल बोलले होते परंतु नंतर दोघांनीही तसे न करण्याचा निर्णय घेतला.